बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानला बुधवारी ( २२ मे ) अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उष्माघाताचा त्रास झाल्याने त्याच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. शाहरुख रुग्णालयात दाखल झाल्याचं कळताच त्याचे लाखो चाहते त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत होते. तसेच अभिनेत्याची पत्नी गौरी खान, त्यांची जवळची मैत्रीण जुही चावला व तिचे जय मेहता हे सगळेच किंग खानची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

शाहरुख खानला बुधवार, २२ मे रोजी उष्माघातामुळे अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयातील डॉक्टरांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला डिहायड्रेशनचा त्रास होत होता. अशातच मंगळवारी अहमदाबादमध्ये केकेआर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात प्ले-ऑफ सामना झाला. या मॅचसाठी शाहरुख दोन दिवसांपूर्वी अहमदाबादला पोहोचला होता. सामना संपल्यानंतर, शाहरुख रात्री उशिरा टीमसह अहमदाबादमधील ITC नर्मदा हॉटेलमध्ये पोहोचला, जिथे या सगळ्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. परंतु, बुधवारी सकाळी अभिनेत्याची प्रकृती बिघडली.

Shivani Tyagi suicide news
ऑफिसमधल्या मानसिक आणि शारिरीक छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या, बँकेने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण
MS Dhoni radhika marchant Anant ambani
Anant Radhika Wedding : एमएस धोनीची अनंत-राधिकासाठी खास पोस्ट, पत्नीची काळजी कशी घ्यायची याचा सल्ला देत म्हणाला…
8 year old girl raped in andhra pradesh Crime news
धक्कादायक! शाळेतील मित्रांकडूनच आठ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; श्वान पथकाने आरोपींचा ‘असा’ काढला माग
worli hit and run case
Worli Hit and Run Case : प्रदीप नाखवांचा हा आक्रोश पाहून तुमचंही मन हेलावून जाईल! म्हणाले, “मी बोनेटवर हात मारला, पण…”
Mihir Shah
Worli Hit and Run Case : “मिहीर शाह रेड बुल प्यायला, त्याने मद्य…”, पब मालकाने काय सांगितलं?
vishal pandey parents demand Get Armaan Malik out from bigg boss ott 3
Video: “अरमान मलिकला बाहेर काढा”, विशाल पांडेच्या आई-वडिलांनी भावुक होत ‘बिग बॉस’ला केली विनंती, म्हणाले…
a banner holding young guy suggest to friends always be aware from people who instigate people
“चांगली मैत्री लोकांना बघवत नाही..” तरुणाने दिला मित्रांना मोलाचा सल्ला, पाहा VIDEO
loksatta ulta chasma
उलटा चष्मा: लाडका भाऊराया..

हेही वाचा : “घाणेरडी कॉमेडी करून गलिच्छ सिनेमा करायचा”, आनंद इंगळेंनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “तो विशिष्ट काळ…”

शाहरुखवर सकाळी प्राथमिक उपचार करण्यात आले परंतु, त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने दुपारी एकच्या सुमारास त्याला केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्याला पुरेशी विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. शुक्रवारी सकाळी ( २३ मे ) शाहरुखला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी माहिती समोर आली आहे.

शाहरुखच्या प्रकृतीबद्दल ‘न्यूज १८’ शी संवाद साधताना जुही चावला म्हणाली, “काल ( बुधवार २२ मे ) रात्रीपासून त्याच्या प्रकृतीत सुधारणा आहे. त्याची उत्तमप्रकारे काळजी घेतली जात आहे. तो लवकरच बरा होईल डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. आता आमची टीम अंतिम सामना खेळेल तेव्हा तो या वीकेंडला टीमला सपोर्ट करण्यासाठी नक्की स्टेडियममध्ये येईल.”

हेही वाचा : शाहरुख खान अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल, उष्माघातामुळे प्रकृती खालावली

दरम्यान, शाहरुखच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळताच गौरीने अहमदाबाद गाठलं आहे. तर, त्याची लेक सुहाना तिच्या जवळच्या मैत्रिणी अनन्या पांडे, शनाया कपूर आणि नव्या नवेली नंदा यांच्याबरोबर मुंबईत परतली आहे. अहमदाबादमध्ये गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. देशभरात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये उष्माघाताचे रुग्ण उपचार घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.