Shraddha Kapoor Shared A Post : लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर हिनं तिच्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्रीनं आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांतून काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. श्रद्धा कपूरचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. सोशल मीडियावर तिचे दशलक्षामध्ये फॉलोअर्स आहेत. तर, सोशल मीडियावरून अभिनेत्री स्टोरी, पोस्ट शेअर करीत प्रेक्षकांच्या संपर्कात राहत असते.

श्रद्धा तिच्या पोस्टमधून तिच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी, तसेच नवीन अपडेट शेअर करीत असते. श्रद्धा ही तिच्या साध्या राहणीमानासाठी ओळखली जाते. त्यामुळे ती प्रेक्षकांना आपलीशी वाटते. सोशल मीडियावर तिचे अनेक रील व्हायरल होत असतात. अशातच अभिनेत्रीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमधून कविता लिहिलेली पाहायला मिळतेय.

श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत यामधून प्रेमावर आधारित कविता लिहिलेली पाहायला मिळतेय. तिने लिहिलं आहे की,

“जब तुम अकेले हो,
मैं तुम्हारे पास बैठ जाऊंगी
जब तुम उदास हो
मैं तुम्हे बाहों में भर लूंगी
मुझे पता हैं तुम खो जाते हों
मुझे पता हैं तुम भाग जाते हों
लेकिन मैं तुम्हें धुंड लूंगी
और तुम्हे थाम लूंगी”

जेव्हा तू एकटा असशील,
तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन
जेव्हा तू उदास असशील
तेव्हा मी तुला मिठीत घेईन
मला माहीत आहे
तू मधेच हरवतोस,
पळून जातोस,
पण मी तुझा शोध घेईन अभिनेत्रीने ही संदर कविता तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
श्रद्धा कपूरची स्टोरी

दरम्यान, श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती नुकतीच ‘स्त्री २’ या चित्रपटातून झळकली होती. तिची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालासुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यापूर्वी अभिनेत्री रणबीर कपूरसह ‘तू झूठी में मक्कार’ या चित्रपटात झळकली होती. यातील रणबीर व श्रद्धा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटानंसुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर अभिनेत्री ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.