Koffee With Karan 8: ‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझन नुकताच सुरू झाला आहे. पहिल्याच भागापासून हा सीझन वादाच्या भोवऱ्यात अडकायला सुरुवात झाली आहे. पहिल्या भागात दीपिका पदूकोण व रणवीर सिंह यांनी हजेरी लावली. यावेळी आपल्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा करताना दीपिकाने केलेलं एक वक्तव्य प्रचंड व्हायरल झालं आणि त्यावरून लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोलही करायला सुरू केलं.

आता करण जोहरच्या चॅटशोमध्ये पुढील भागात सनी देओल आणि बॉबी देओल हजेरी लावणार आहेत. या भागात सनी देओल आणि बॉबी देओल यांनी बऱ्याच विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. या शोमध्ये सनी देओलने ‘गदर २’च्या यशावर भाष्य केलं आहे. ‘गदर २’च्या बरोबरीनेच अक्षय कुमार व पंकज त्रिपाठी यांचा ‘ओह माय गॉड २’ प्रदर्शित झाला होता. त्यावेळी सनी देओलने अक्षय कुमारला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंतीही केली असल्याचा खुलासा सनी देओलने करण जोहरच्या या शोमध्ये केला.

Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
akshay kumar share update on phir hera pheri 3
‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”

आणखी वाचा : “जवान प्रदर्शित करा, नाहीतर…” वाढदिवशी शाहरुख खानने नेटफ्लिक्सला धरलं वेठीस; व्हिडीओ चर्चेत

याबद्दल प्रश्न विचारल्यावर सनी देओल म्हणाला, “चित्रपट पुढे ढकलणं शक्य असेल तर तसं करावं हे मी अक्षयला सुचवलं होतं, पण त्याने स्टुडिओची आणि इतर कारणं देत याला नकार दिला. त्यावर मी काहीच बोललो नाही. मी विनंती करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही.” २००१ सालीही ‘लगान’ आणि ‘गदर’ समोरासमोर आल्याने अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचंही सनीने कबूल केलं. ‘लगान’ला समीक्षकांचं प्रेम मिळालं, पण बॉक्स ऑफिसवर मात्र ‘कभी खुशी कभी गम’नंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘गदर’ हाच चित्रपट ठरला.

‘गदर २’ व ‘ओह माय गॉड २’ या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं, पण कदाचित ‘ओह माय गॉड २’ नंतर प्रदर्शित झाला असता तर आणखी चांगली कामगिरी करू शकला असता असं मत काही ट्रेड एक्स्पर्टनी मांडलं. ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटात लैंगिक शिक्षण व हस्तमैथुनसारख्या गंभीर विषयांवर भाष्य केलं गेलं ज्यामुळे हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडला. ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींची तर ‘ओह माय गॉड २’ने २०० कोटींची कमाई केली.