बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला आता चार वर्षं पूर्ण होतील. अजूनही मनोरंजनसृष्टीत त्याची आठवण काढली जाते. प्रेक्षक, चाहते यांच्या मनात सुशांतचं अजूनही तितकंच महत्त्वाचं स्थान आहे.

सुशांतच्या आकस्मिक निधनानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजली होती. सुशांतच्या कुटुंबीयांनाही याचा खूप मोठा धक्का बसला होता. सुशांतने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं; परंतु त्याच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या असल्याची गोष्ट नाकारली. नंतर सुशांतची केस सीबीआयकडे सोपवण्यात आली; परंतु अजूनही या केसचा उलगडा झालेला नाही. त्याबद्दल आता सुशांतच्या बहिणीनं थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.

हेही वाचा… “अनेकदा मला गुदमरल्यासारखं…”, कतरिना कैफला बॉलीवूडमध्ये काम करताना आला होता ‘असा’ अनुभव, म्हणाली…

सुशांतची बहीण श्वेता सिंहनं तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणाली, “मी हा संदेश आपले पंतप्रधान मोदीजी यांच्यासाठी रेकॉर्ड करतेय. तुमचं लक्ष वेधून घेण्याचं कारण असं की, आता माझ्या भावाचं निधन होऊन ४५ महिने झाले आहेत. परंतु, या केसशी संबंधित सीबीआयकडून कोणतीच नवीन माहिती आमच्याकडे आलेली नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की, कृपा करून या केसमध्ये तुम्ही हस्तक्षेप करा. कारण- एक कुटुंब आणि देश म्हणून आम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही अजूनही शोधतोय.”

सुशांतच्या बहिणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर “सुशांतला न्याय द्या”, अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत.

हेही वाचा… VIDEO: Ed sheeran थिरकला बॉलीवूड गाण्यावर; शाहरुख खानबरोबर त्याची सिग्नेचर पोज देणारा व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील राहत्या घरात निधन झालं. त्यानं आत्महत्या केली आहे, असं पोलिसांनी जाहीर केलं होतं; परंतु त्याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या केसमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचीही चौकशी करण्यात आली होती आणि तिच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. २०२० पासून श्वेता आपल्या भावाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करतेय.