सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपल्या बाळाचा चेहरा का दाखवत नाहीत? जाणून घ्या कारणं | why Bollywood Celebrities Do Not Show Their Baby Face On Social Media real Reason Behind It nrp 97 | Loksatta

सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपल्या बाळाचा चेहरा का दाखवत नाहीत? जाणून घ्या कारणं

सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपल्या बाळाचा चेहरा का दाखवत नाहीत? जाणून घ्या खरं कारण

Bollywood Celebrities
सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपल्या बाळाचा चेहरा का दाखवत नाहीत? जाणून घ्या खरं कारण

बॉलिवूड कलाकारांच्या प्रत्येक गोष्टींवर प्रसारमाध्यमांची कायमच नजर असते. एखादा सेलिब्रेटी काय करतो, कुठे जातो, काय खातो यासर्व गोष्टींवर पापाराझी कायमच नजर ठेवून असतात. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आपल्या मुलांना लाइमलाइटपासून दूर ठेवताना दिसतात. अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, सोनम कपूर यासारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरही आपल्या मुलांचे फोटो शेअर केले असले तरी अद्याप त्यांचे चेहरे दाखवलेले नाहीत. पण आता यामागचे कारणही समोर आलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी वामिका कायमच चर्चेत असते. वामिकाची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते उत्सुक असतात. पण विराट-अनुष्का तिचे फोटो शेअर करताना तिचा चेहरा लपवून ठेवतात. त्यामागचे कारणही त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

एका मुलाखतीदरम्यान त्यांनी पापाराझींना त्याच्या मुलीचा फोटो न काढण्याची विनंती केली होती. यावेळी ते म्हणाले, “आम्हाला आमच्या बाळाचे आयुष्य खासगी ठेवायचे आहे. तसेच त्याला सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांपासूनही दूर ठेवत मुक्तपणे आयुष्य जगण्याची संधी द्यायची आहे. ती अजून लहान आहे. त्यामुळे आम्ही तिच्या छोट्या मोठ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. आम्हाला तुमचा पाठिंबा आणि आधाराची गरज आहे. त्यामुळे कृपया थोडा धीर धरा.”

तसेच आलिया भट्ट-रणबीर कपूर काही महिन्यांपूर्वी आई-बाबा बनले आहेत. त्या दोघांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे. आलिया-रणबीरने या दोघांनीही मुलीला कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांनीही ‘नो फोटो पॉलिसी’ पाळण्याची विनंती केली.

“आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया राहा दोन वर्षांची होईपर्यंत तिचे फोटो काढू नका. तसेच जेव्हा तुम्ही गाडीत असताना कॅमेऱ्यातून झूम करुन पाहता आणि जर तुम्हाला तिचा फोटो मिळाला तरीही तो कुठेही सोशल मीडियावर पोस्ट करु नका. ती मोठी होईपर्यंत आणि तिला याबद्दल कळेपर्यंत आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर तिला फोटो द्यायचे की नाही हे ती स्वत: ठरवेल”, असे त्या आलिया-रणबीरने सांगितले होते.

तर सोनम कपूरने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये मुलाला जन्म दिला. तिने तिच्या बाळाचे नाव वायू असे ठेवले आहे. मात्र अद्याप सोनमने वायूचा चेहरा दिसत असलेला एकही फोटो शेअर केलेला नाही. एका मुलाखतीत सोनमने याबद्दल भाष्य केले होते.

“माझा मुलगा जोपर्यंत मोठा होत नाही, तोपर्यंत त्याचे फोटो काढावेत, असे मला तरी वाटत नाही. त्याला त्याचे फोटो काढायला द्यायवे असं वाटतं की नाही, हे माझ्या मुलाची निवड ठरवेल”, असे सोनम कपूरने म्हटले.

तसेच बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये सक्रीय असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिची मुलगी मालती मेरीसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. ती अनेकदा तिच्या लेकीबरोबर फोटो पोस्ट करत असते. मात्र तिने अद्याप तिचा चेहरा दाखवलेला नाही. मालती मोठी होईपर्यंत मी पापाराझीपासून दूर ठेवेन, असे तिने एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 18:26 IST
Next Story
डेव्हिड वॉर्नरलाही पडली ‘पठाण’ची भूरळ; शाहरुख खानचा चेहरा एडिट करत क्रिकेटरने लावला स्वत:चा फोटो, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…