आदित्य ठाकरेंचा या अभिनेत्रीसोबतचा फोटो ठरतोय चर्चेचा विषय

या अभिनेत्रीसोबत आदित्य ठाकरेंना एका हॉटेलबाहेर पाहिलं गेलं.

aditya thackeray
आदित्य ठाकरे

शिवसेना नेते व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ते चर्चेत असण्यामागचं कारणंही तसंच आहे. मुंबईतील एका हॉटेलबाहेर त्यांना एका अभिनेत्रीसोबत पाहिलं गेलं. ही अभिनेत्री म्हणजे ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘बागी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली दिशा पटानी. आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यांच्या मैत्रीची चर्चा रंगली आहे.

‘धोनी’ या चित्रपटानंतर प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री दिशा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. अनेकदा या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. कधी लंच डेट तर कधी पार्ट्यांमध्ये दिशा-टायगरला एकत्र पाहिलं गेलं. पण या दोघांनी प्रसारमाध्यमांसमोर कधीच नात्याला स्वीकारलं नाही. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असंच दोघे म्हणत आले.

https://www.instagram.com/p/Bu0upIQFxTD/

दिशाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच सलमान खानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटात झळकणार आहे. सलमान आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात दिशा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Disha patani papped on a lunch outing with aditya thackeray see photos

ताज्या बातम्या