Latest Entertainment News Today 23 May 2025 : बॉलीवूडची स्टार अभिनेत्री ऐश्वर्या रायने यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर सुंदर आयव्हरी साडी नेसून एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं. आता ऐश्वर्याचा रेड कार्पेटवरील दुसरा लूक देखील सर्वत्र चर्चेत आला आहे. तिने परिधान केलेल्या बनारसी ब्रोकेड केपवर संस्कृत श्लोक लिहिण्यात आला आहे. याचे फोटो सध्या व्हायरल होत आहे. याशिवाय आलिया भट्ट सुद्धा मुंबई एअरपोर्टवरून कान्ससाठी रवाना झाली आहे. मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात घडणाऱ्या रंजक घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…

Live Updates

Entertainment News 23 May 2025

18:21 (IST) 23 May 2025

"मी ८५ वर्षांची मुलगी आहे…", हेलन यांनी त्यांच्या फिटनेसने केले सर्वांना आश्चर्यचकित, जिममध्ये 'पिया तू अब तो आजा' या गाण्यावर थिरकल्या

हेलन यांचा फिटनेसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ...सविस्तर वाचा
18:12 (IST) 23 May 2025

रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपटातील नवा लूक पाहून चाहते हैराण, डोबिंवलीत सुरू आहे शूटिंग, व्हिडीओ व्हायरल

रणवीर सिंहचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...सविस्तर बातमी
17:44 (IST) 23 May 2025
अजय देवगणचा 'रेड 2' 22व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुवांधार, 'छावा'ला मागे टाकणार?

अजय देवगण स्टारर 'रेड 2' चित्रपट रिलीज होऊन 22 दिवस पूर्ण झालेत. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं गेल्या 21 दिवसांत उत्तम कलेक्शन करुन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 'मिशन इम्पॉसिबल 8' आणि 'फायनल डेस्टिनेशन 6' हे दोन बहुप्रतिक्षित हॉलीवूड सिनेमे रिलीज झालेत. पण, या दोन्ही हॉलीवूड सिनेमांसमोर 'रेड 2' पुरुन उरला आहे. 'रेड 2'नं रिलीजच्या बावीसाव्या दिवशी धमाकेदार कमाई केली.

17:19 (IST) 23 May 2025

आलिया भट्ट निघाली 'कान्स'ला; एअरपोर्टवर 'त्या' बॅगनं वेधलं लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क...

आलियाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर तिच्या कान्स पदार्पणाबद्दल आनंद व्यक्त केला. ...वाचा सविस्तर
16:37 (IST) 23 May 2025

जान्हवीच्या घरी आला वेंकी दादा! कपाटात मिळणार 'ती' वस्तू…; विकृत जयंतचा खरा चेहरा उघड होईल का? पाहा प्रोमो

Video : जान्हवीच्या घरी आले वेंकी दादा अन् वहिनी! जयंत करणार आजारपणाचं नाटक, पण वेंकीला कपाटात दिसणार असं काही...; पाहा प्रोमो ...सविस्तर बातमी
16:13 (IST) 23 May 2025

रणवीर सिंहचा नवा अवतार पाहून चाहते हैराण, 'धुरंधर'च्या सेटवरून अभिनेत्याचा नवा व्हिडीओ लीक

रणवीर सिंह त्याच्या आगामी 'धुरंधर' चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत पूर्ण झाले आहे आणि पुढील सेट अमृतसरमध्ये बसवला जाईल. आता सेटवरील त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याचा कडक लूक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. रणवीर लांब कोट आणि लांब केसांमध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे.

15:56 (IST) 23 May 2025

विकी कौशलचा मराठी चित्रपटाला पाठिंबा; ऋजुता देशमुखच्या लेकीच्या पहिल्याच सिनेमाचं केलं कौतुक, ट्रेलर शेअर करीत म्हणाला…

विकी कौशलचा मराठी चित्रपटाला पाठिंबा, 'एप्रिल मे ९९' चित्रपटाचं केलं भरभरुन कौतुक म्हणाला... ...अधिक वाचा
15:30 (IST) 23 May 2025

रमा शिकवणार माहीला धडा! अक्षयबरोबर नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आखला नवीन प्लॅन, पाहा प्रोमो…

अक्षय समोर येणार माहीचं सत्य? रमाने आखला नवा प्लॅन, पाहा प्रोमो ...सविस्तर वाचा
15:17 (IST) 23 May 2025

"उद्याही सूर्य उगवेल…", सूरज पंचोलीच्या 'केसरी वीर' चित्रपटाला सलमान खानचा पाठिंबा, म्हणाला…

सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर सूरज पंचोलीबरोबर मोशन क्लिप्सचा एक कोलाज शेअर केला आहे. ...सविस्तर वाचा
15:12 (IST) 23 May 2025

'हाऊसफुल ५'मधील नवीन गाणं 'कयामत'चा टीझर रिलीज, स्टार्स दिसले क्रूझवर पार्टी करताना

'हाऊसफुल ५' या कॉमेडी ड्रामा चित्रपटातील 'कयामत' या नवीन गाण्याचा टीझर काही मिनिटांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि जॅकलिन व्यतिरिक्त चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट क्रूझवर नाचताना दिसत आहे.

14:10 (IST) 23 May 2025

राजकुमार रावचा 'भूल चूक माफ' करणार दमदार ओपनिंग? पहिल्या दिवशी किती करेल कमाई? जाणून घ्या

Bhool Chuk Maaf Box Office Collection Day 1 : राजकुमार राव स्टारर 'भूल चूक माफ' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई करू शकतो?जाणून घ्या. ...अधिक वाचा
13:31 (IST) 23 May 2025

परेश रावल यांना 'हेरा फेरी ३' साठी कायदेशीर नोटीस, ७ दिवसांत द्यावे लागणार उत्तर

अक्षय कुमारच्या प्रोडक्शन हाऊस केप ऑफ गुड फिल्म्सने 'बाबू भैया' म्हणजेच परेश रावल यांना 'हेरा फेरी ३' सोडल्याबद्दल नोटीस बजावली आहे. प्रोडक्शन हाऊसचा दावा आहे की या प्रोजेक्टवर काम आधीच सुरू झाले आहे. अक्षयच्या कंपनीकडून आलेल्या नोटीसमध्ये असा दावा करण्यात आला आहे की परेश रावल यांना प्रोजेक्ट सोडण्यापूर्वी ११ लाख रुपये देण्यात आले होते.

12:52 (IST) 23 May 2025

मिथिला पालकरच्या आजीचं निधन; अभिनेत्रीने शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाली, "तिच्याशिवाय…"

मिथिला पालकरच्या आजीचं निधन, अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती, म्हणाली... ...सविस्तर वाचा
12:38 (IST) 23 May 2025

शिल्पा शिरोडकरनंतर अभिनेत्री निकिता दत्ता करोना पॉझिटिव्ह; पोस्ट शेअर करीत म्हणाली…

निकिताबरोबर तिच्या आईलाही करोनाची लागण झाली आहे. निकिताने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. ...सविस्तर वाचा
12:30 (IST) 23 May 2025

सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ 'हंटर २'मध्ये करणार धमाल; कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या

बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची बहुप्रतिक्षित सीरीज 'हंटर २' बद्दल मोठी माहिती समोर आली आहे. आता ही सीरीज लवकरच दुसऱ्या सीझनसह प्रेक्षकांसाठी प्रसारित होणार आहे. या सीरीजमध्ये जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी जबरदस्त स्टाईलमध्ये दिसणार आहेत.

11:57 (IST) 23 May 2025

'हेरा फेरी ३'मधून परेश रावल यांची एक्झिट, आता बाबू भय्याची भूमिका कोण साकारणार? 'या' अभिनेत्याच्या नावाची चर्चा

परेश रावल यांच्या एक्झिटनंतर 'हेरा फेरी ३' मध्ये 'हा' अभिनेता साकारणार बाबू भैय्याची भूमिका? ...सविस्तर वाचा
11:47 (IST) 23 May 2025

कर्नाटक सरकारने अभिनेत्री तमन्ना भाटियाला दिली 'ही' जबाबदारी, काय आहे नेमकं प्रकरण?

कर्नाटक सरकारने बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड (केएसडीएल) ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे, जी म्हैसूर सँडल साबण बनवते. बुधवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या आदेशात म्हटले आहे की भाटिया यांची दोन वर्षांसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ज्याची किंमत ६.२ कोटी रुपये असेल. परंतु लोकांनी या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

11:17 (IST) 23 May 2025

साडीनंतर ऐश्वर्या रायचा रेड कार्पेटवर मॉडर्न लूक, मुलगी आराध्याही होती सोबतीला

ऐश्वर्याच्या दुसऱ्या लूकने देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. ...अधिक वाचा
10:50 (IST) 23 May 2025

अभिनेत्री निकिता दत्ताला करोनाचं निदान, इन्स्टाग्रामवर दिली हेल्थ अपडेट

बॉलीवूड अभिनेत्री निकिता दत्ता हिला करोनाची लागण झाली आहे. तिच्याबरोबर तिच्या आईलाही करोनाची लागण झाली आहे . निकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे.

10:21 (IST) 23 May 2025

आलिया भट्ट कान्सला रवाना, रेड कार्पेटवर करणार पदार्पण

आलिया भट्ट 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. आलिया भट्ट मुंबई विमानतळावर कार्यक्रमासाठी रवाना होताना दिसली. कार्यक्रमासाठी जाताना ती खूपच स्टायलिश दिसत होती.

https://www.instagram.com/viralbhayani/?utm_source=ig_embed&ig_rid=41309fa3-d9cd-4eb0-9b5f-2628714f92f1

09:42 (IST) 23 May 2025

Cannes 2025 : ऐश्वर्या रायचा नवीन लूक पाहिलात का? 'त्या' श्लोकाने वेधलं लक्ष

ऐश्वर्याने रेड कार्पेटवर परिधान केलेल्या बनारसी ब्रोकेड केपवर ||कर्मण्येवाधिकारी मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि|| हा संस्कृत श्लोक लिहिण्यात आला आहे. ( फोटो सौजन्य : Lewis Joly/Invision/AP)

जगभरात सध्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ची जोरदार चर्चा चालू आहे. यंदा या कार्यक्रमाला अनेक बॉलीवूड स्टार्सनी उपस्थिती लावली होती. तर, आलिया भट्ट या महोत्सवासाठी नुकतीच रवाना झाली आहे. आता तिचा रेड कार्पेट लूक काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.