अवघ्या वीस तासांमध्ये ‘फिलहाल २’च्या टीझरला ८.५ मिलियन व्ह्यूज; अक्षय कुमार आणि नुपुर सेननच्या जोडीची जादू

मोस्ट अवेटेड ‘फिलहाल २’ गाण्याच्या टीझर आऊट झाल्यानंतर अवघ्या २० तासांमध्येच तब्बल ८.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

Filhaal-2-Teaser
(Photo: Instagram@akshaykumar)

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. चित्रपटांसोबतच तो सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजमुळे देखील चर्चेत असतो. अक्षयचा असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ गेल्या मोस्ट अवेटेड ‘फिलहाल २’ गाण्याच्या टीझरचा आहे. विशेष म्हणजे या गाण्याचा टीझर आऊट झाल्यानंतर अवघ्या २० तासांमध्येच तब्बल ८.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटांसाठी कायम चर्चेत असतो. गेल्या वर्षीपासून त्याचे बरेच चित्रपट रिलीजच्या प्रतिक्षेत आहेत. पण सध्या तो त्याच्या आगामी म्यूजिक व्हिडीओ ‘फिलहाल 2’साठी सोशल मीडियावर बराच चर्चेत आलाय. अक्षय कुमार आणि नुपुर सेनन स्टारर मोस्ट अवेटेड ‘फिलहाल 2’ या गाण्याची पहिली झलक समोर आलीय. यात अक्षय कुमार त्याच्या Ex-गर्लफ्रेंडच्या लग्नात डान्स करताना दिसून येतोय. पण डान्स करताना त्याचे डोळे पाणावलेले पाहून या गाण्यात एका अधुऱ्या लव्ह स्टोरीचा प्रीक्वल असणार असा अंदाच चाहते लावत आहेत. या टीझरमध्ये अभिनेत्री नुपुर नवरीच्या लूकमध्ये खूपच गोड दिसून येत आहे.

अक्षय कुमारने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट लिहित हा टीझर शेअर केलाय. यात त्याने लिहिलंय, ” फिलहाल वर प्रेम करण्यासाठीची वेळ जवळ आलीय…’फिलहाल २’ चं नवं गाणं ६ जुलै रोजी रिलीज होणार आहे…तोपर्यंत तुम्ही टीझर एन्जॉय करा…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

‘फिलहाल’ गाण्याचा पहिल्या पार्ट रिलीज झाल्यानंतर नवा रेकॉर्ड केला होता. हे गाणं जुलै २०२० मध्ये रिलीज झालं होतं. काही दिवसांतच हे गाणं टॉप टेन वर्ल्ड फास्टेस्ट म्यूजिक व्हिडीओमध्ये आलं. या गाण्याच्या यशानंतर ‘फिलहाल २’ हा दुसरा पार्ट रिलीज करण्यात येणार आहे. त्याचं हे नवं गाणं येत्या ६ जुलै रोजी रिलीज करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Filhaal 2 mohabbat teaser akshay kumar and nupur sanon song got more than 8 5 million views in just 20 hours prp

ताज्या बातम्या