छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय व तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी २’चा या शोच्या विजेतेपदावर शिव ठाकरेनं आपलं नाव कोरलं आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यामध्ये शिवच्या नावाची घोषणा करण्यात आली. गेल्या १०० दिवसांपासून बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या स्पर्धकांपैकी नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर व वीणा जगताप हे सहा स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. मात्र त्यापैकी शिवने बाजी मारत जेतेपदाची ट्रॉफी आणि १७ लाखांची बक्षिसाची रक्कमही जिंकली. विजेतेपद मिळवल्यानंतर या पैशांचे काय करणार याबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवने खुलासा केला.
‘बिग बॉस मराठी २’ शोचे जेतेपद मिळाल्याचा खूप आनंद झाल्याचे शिवने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ‘आजचा दिवस खूपच खास असून मला एखाद्या रिअॅलिटी शोचे जेतेपद मिळावे हे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मी बिग बॉसच्या घरामध्ये भरपूर धम्माल केली,’ अशी भावना शिवने व्यक्त केली. बक्षीसाची मिळालेली १७ लाखांची रक्कम आईकडे देणार असल्याचे शिवने सांगितले. शिव हा मूळचा अमरावतीचा असून पहिल्यांदा तो रोडीजच्या रिअॅलिटी शोमधून छोट्या पडद्यावर दाखळ झाला होता. शिवने अमरावतीमध्येच काही वर्षांपूर्वी एक घर घेतले आहे. याच घरासाठी त्याने काही कर्ज घेतले होते. बक्षिसाच्या पैशांमधून हे कर्ज फेडणार असल्याचे शिवने सांगितले. ‘मी काही वर्षांपूर्वी अमरावतीमध्ये एक घर घेतलयं. या घरासाठी तेथील एका बँकेकडून कर्ज घेतलं होतं. बक्षिसाच्या रक्कमेमधून मी सर्वात आधी ते कर्ज फेडणार आहे,’ असं शिवने स्पष्ट केलं. तसचं या शोचा विजेता झाल्याने सर्वच गोष्टी मिळाल्याचा आनंदही शिवने यावेळी बोलताना व्यक्त केला.
‘बिग बॉस मराठी २’ चे होस्ट महेश मांजरेकर यांनी अंतिम सोहळ्यामध्ये शिवला चित्रपटाची ऑफर दिली. ही ऑफर ऐकून मला खूप जास्त आनंद झाला आहे असं सांगतानाच आपल्याला आधीपासून अभिनय श्रेत्रात करियर कराची इच्छा होती असंही शिवने स्पष्ट केलं. मांजरेकर यांनी मराठी चित्रपटामध्ये संधी दिली असली तरी मराठीबरोबरच हिंदीमध्येही काम करायला आवडेल असंही शिवने यावेळी बोलताना सांगितले. ‘रोडीज’ या रिअॅलिटी शोमधून चर्चेत आला शिवला होता. मात्र तेथे त्याला उपांत्या फेरीपर्यंत मजल मारता आली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकला होता. पण ‘बिग बॉस मराठी २’ने त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली. ग बॉसच्या घरात सुरुवातीला तो थोडा शांतच राहिला. पण नंतर त्याने पकडलेला जोर कायम राहिला. बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान शिवने मिळवला होता. त्यानंतर टास्कमध्ये चांगली कामगिरी करत तो नॉमिनेशनपासूनही वाचत आला होता.
शिव ठाकरेचा रंजक प्रवास
अमरावतीचा पठ्ठ्या शिव ठाकरे घरात प्रवेश केल्यापासूनच लोकप्रिय ठरला आहे. ‘रोडीज’ या रिअॅलिटी शोमधून तो चर्चेत आला होता. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला तो थोडा शांतच राहिला. पण नंतर त्याने पकडलेला जोर कायम राहिला. बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान शिवने मिळवला होता. त्यानंतर टास्कमध्ये चांगली कामगिरी करत तो नॉमिनेशनपासूनही वाचत आला होता. वीणा जगतापसोबतची त्याची मैत्री विशेष चर्चेता विषय ठरली.
महाअंतिम सोहळ्यातील परफॉर्मन्स
महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांचे नृत्याविष्कार पाहायला मिळाले. किशोरी शहाणे ‘घर मोरे परदेसिया’ गाण्यावर थिरकल्या तर हिना पांचाळने ‘साकी साकी’ आणि अभिजीत बिचुकलेने ‘सारा जमाना’ या गाण्यावर डान्स सादर केला. तसंच अभिजीत केळकर, वैशाली म्हाडे, रुपाली जाधव, माधव देवचके, मैथिली जावकर यांचेही जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळाले.