‘बिग बॉस १५’ सुरु झाल्यापासून या शो चर्चेचा विषय ठरत आहे. या खेळातील अनेक स्पर्धक हे त्यांच्या तापट स्वभावामुळे आणि वादांमुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच एका भागात प्रतीक सहजपाल आणि जय भानुशालीमधये वाद रंगलेला पाहिला मिळाला. यावेळी जयने प्रतीकला आईवरून शिवीगाळ केली होती.

जय भानुशालीच्या या वागण्यावर शोमधील स्पर्धकांसोबतच अनेक प्रेक्षकांनी देखील नाराजी व्यक्त केलीय. तसचं इतर कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर माजी बिग बॉस स्पर्धक आणि अभिनेत्री काम्या पंजाबीने देखील तिचं मत व्यक्त केलंय.

KBC: “ही तर शिवी आहे ना”, स्पर्धकाची भाषा ऐकून बिग बींना बसला धक्का

खरं तर काही दिवसांपूर्वी काम्या पंजाबीने क्रिकेटमध्ये झालेल्या शिवीगाळ प्रकरणावर एक ट्वीट केलं होतं. यावर एका युजरने काम्याला तिने देखील जुन्या पर्वात अमरमानने शिवीगाळ केल्याने ड्रामा केल्याची आठवण करुन दिली आहे. “क्रिकेटची तुलना बिग बॉससोबत करू नका” असं हा युजर म्हणाला होता. यावर आता काम्या पंजाबीने उत्तर दिलंय. तसंच बिग बॉसच्या घरात शिवीगाळ करण्यावर ती म्हणाली, “अरमान फक्त घटस्फोटीत म्हणाला नव्हता तर त्याने मला आई- बहिणीवरून शिवीगाळ देखील केली होती. मी त्याच्यासमोर हसत होते आणि एकटी असताना ऱडत होते. मी कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही आणि बिग बॉसची प्रॉपर्टी देखील तोडली नाही. नाही तर आम्हा दोघांमध्ये काय फरक राहिला असता आणि शिवी ही शिवीच असते मग ती क्रिकेटमध्ये दिलेली असो किंवा बिग बॉस” असं काम्या या ट्वीटमध्ये म्हणालीय.

Viral Video: ‘नो फोटोग्राफी’ लिहिलेल्या जॅकेटमुळे शाहिद कपूर ट्रोल, नेटकऱी म्हणाले “मग कशाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर काम्या पंजाबीचं हे ट्वीट चांगलच व्हायरल होतंय. या ट्वीटवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. खळबळजनक वक्तव्य असो किंवा सेलिब्रिटींना खडेबोल सुनावणं काम्या पंजाबी कायम तिचं परखड मत मांडत असते.