अभिनेत्री कंगना रनौतने नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. कंगना उत्तर प्रदेश सरकारच्या ODOP या महत्त्वाच्या मोहिमेची अॅम्बेसिडर झाली आहे. कंगना आणि योगी आदित्यानाथ यांच्या भेटीवेळी उत्तर प्रदेश सरकारकडूनच ही घोषणा करण्यात आली आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. या भेटीवेळी कंगनाला योगी आदित्यनाथ यांनी एक विशेष वस्तू भेट म्हणून दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेलं नाणं त्यांनी कंगनाला दिलं आहे. कंगनाने या पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेली भेट खूपच चांगली ठरल्याचं म्हंटलं आहे. “उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी यांना भेटून आनंद झाला. ते अत्यंत चैतन्यशील, साधे आणि प्रेरणादायी आहेत. तरुण, ज्वलंत आणि या राष्ट्रीतील लोकप्रिय नेत्यांपैकी एक असलेल्या योगीजींना भेटणं म्हणजे भाग्य आहे.” असं म्हणत तिने योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलंय.
जॉनी लीवरची मुलगी जेमीने केली सोनम कपूरची मिमिक्री, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
“म्हातारी झाली तरी संस्कार नाही”; व्हायरल व्हिडीओमुळे करीना कपूर ट्रोल
याशिवया कंगनाने योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या भेटवस्तूसाठी त्यांचे आभार मानले आहेत. “आमचा सिनेमा तेजसच्या चित्रिकरणास सहकार्य केल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे आभार,माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आगामी निवडणुकांसाठी शुभेच्छा. पहिले आपल्याकडे उत्तर प्रदेशचे तपस्वी राजा श्रीरामचंद्र होते आणि आता आपल्याकडे योगी आदित्यनाथ जी आहेत” असं म्हणत कंगनाने योगी आदित्यनाथ यांनी तिला रामजन्मभूमी पूजनावेळी वापरण्यात आलेलं नाणं भेट दिल्याचं सांगितलं.
‘तेजस’ सिनेमात कंगना एका महिला वैमानिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबतच ‘धाकड’ सिनेमातही कंगनाचा दंबंग अंदाज पाहायला मिळेल.