सध्या सोशल मीडियावर अभिनेता कार्तिक आर्यन आणि निर्माता दिग्दर्शक करण जोहर दोघंही बरेच चर्तेत आहेत. एकीकडे कार्तिक त्याचा आगामी चित्रपट ‘भूल भुलैय्या २’चं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. तर दुसरीकडे निर्माता करण जोहरनं त्याचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’ बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण याशिवाय हे दोघंही एका जुन्या वादामुळे देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट ‘दोस्ताना २’मधून कार्तिक आर्यनला बाहेर केल्यानंतर बराच वाद झाला होता. या वादावर कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या कार्तिकनं आता मात्र यावर मौन सोडलं आहे. पहिल्यांदाच त्यानं या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘दोस्ताना २’ या चित्रपटाची २०१९ मध्ये घोषणा झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये अचानक करण जोहर आणि कार्तिक आर्यन यांच्यात वाद झाल्याचं आणि कार्तिकला चित्रपटातून बाहेर केल्याचं वृत्त समोर आलं. कार्तिकच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे करण जोहर नाराज होता आणि त्यामुळेच त्यानं हा निर्णय घेतल्याचं कारण त्यावेळी देण्यात आलं होतं. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार होती.

आणखी वाचा- “सर्वकाही परफेक्ट असूनही…” सासरी घडणाऱ्या ‘या’ गोष्टीला त्रासली आहे करीना कपूर

आता ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यननं या संपूर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिकला या मुलाखतीत, ‘तुला अभिनयाची कौटुंबीक पार्श्वभूमी नाहिये. अशात बॉलिवूडमधील लोकांशी तुझे मतभेद आहेत त्यामुळे त्याचा कामावर परिणाम होत आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना कार्तिक म्हणाला, ‘मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. यावर मी फक्त एवढंच सांगेन की एकदा माझे आगामी चित्रपट पाहा. त्यातूनच सर्व उत्तरं मिळतील.’

आणखी वाचा- “या सर्व केवळ अफवा…” केएल राहुल- अथियाच्या लग्नाच्या चर्चांवर भाऊ अहान शेट्टीनं सोडलं मौन

बॉलिवूडकर आहेत कार्तिकच्या विरोधात?
या मुलाखतीत कार्तिकनं बॉलिवूडकर त्याच्या विरोधात आहेत का? यावरही भाष्य केलं. तो म्हणाला, “त्याचं असं आहे की, लोक कधी कधी एखादी गोष्ट उगाचच ताणतात. यापेक्षा जास्त काहीच नाही. सध्या कोणाकडेच अशाप्रकारे एखाद्याच्या विरोधात ग्रुप करून त्याला विरोध करण्याएवढा वेळ नाहीये. सध्या प्रत्येकाचं लक्ष त्याच्या कामाकडे आहे. या व्यतिरिक्त सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत.”

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सध्या कार्तिक आर्यन त्याचा आगमी चित्रपट ‘भूल भुलैय्या २’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलं आहे. याआधी २००७ साली प्रियदर्शनचा ‘भूल भुलैय्या’ प्रदर्शित झाला. ज्यात अक्षय कुमार, विद्या बालन यांसारखे कलाकार होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. आता कार्तिक आर्यनच्या चित्रपटाबाबत बोलायचं तर, या चित्रपटात कियारा आडवाणी, तब्बू, संजय मिश्रा, राजपाल यादव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २० मे दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.