कोकण हार्टेड गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली अंकिता वालावालकर सध्या काही ना काही कारणांनी सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अंकिता वालावालकरसह अनेक सोशल मीडिया रिल स्टार्सने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आता तिने त्या भेटीबद्दल भाष्य केले आहे.

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावालकरने ‘दॅट ऑड इंजिनिअर’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला राज ठाकरेंच्या भेटीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी तिने राज ठाकरेंना भेटायला मिळणं, बोलायला मिळणं, हेच खूप मोठं भाग्य आहे, असे अंकिता म्हणाली.
आणखी वाचा : Video : “तुला बघते थांब…”, मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचं भर सेटवर भांडण, व्हिडीओ आला समोर

“राज ठाकरे किंवा त्यांचं कुटुंब हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे, मी त्यांना खूप जवळून पाहिलं. आम्ही जेव्हा राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा तिथे राजकीय मुद्द्यांवर अजिबात चर्चा झाली नाही”, असे अंकिताने सांगितले.

“मला जेव्हा फोन आला तेव्हा एक कुटुंब असल्याची भावना जर मला कोणत्या नेत्याकडून येत असेल तर ते राजसाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंनंतर जर त्यांचं जिवंत रुप जर आपण संपूर्ण महाराष्ट्र बघत असेल तर ते राजसाहेब ठाकरे आहेत. त्यांना भेटायला मिळणं, त्यांच्याशी बोलायला मिळणं हेच खूप मोठं भाग्य आहे.

महाराष्ट्राचं भविष्य काय असू शकतं हे त्यांना नीट कळलं आहे, आपण काय करायला हवं, हे पण त्यांना समजलं आहे. जर राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी होणारी गर्दी म्हणजे महाराष्ट्राचे नाव किती होईल”, असा विचारही तिने मांडला.

आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य

आणखी वाचा : “ओंकार भोजने आणि तुझं नातं काय?” कोकण हार्टेड गर्ल म्हणाली, “आम्ही एकमेकांचे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राज ठाकरेंना भेटल्यानंतर अनेकांना मी मनसेचा अजेंडा घेऊन आलीय किंवा त्यांचं प्रमोशन करते असं वाटतं. खरंतर मला हे सर्व करायला आवडेल. जर त्यांनी मला सांगितलं तर नक्कीच मला करायला आवडेल. कारण मला जेव्हा जेव्हा गरज लागली, तेव्हा मनसेने मला मदत केली आहे”, असेही अंकिताने यावेळी म्हटले.