बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूरने ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातून स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. आता कुणाल खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. कुणालची पत्नी नैना बच्चनने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. नैना ही अमिताभ बच्चन यांचा भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी आहे. कुणाल आणि नैना आई-बाबा झाल्यामुळे कपूर आणि बच्चन कुटुंबीय आनंदी झाले आहेत. अमिताभ आणि अजिताभ हे आजोबा झाल्यामुळे आनंद व्यक्त करत आहेत.

कुणाल आणि नैनाने लग्नाच्या जवपास सात वर्षांनंतर गूड न्यूज दिली आहे. कुणालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. ‘नैना आणि मला तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की आम्ही एका मुलाचे आई-बाबा झाले आहोत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद’ या आशयाची पोस्ट कुणालने केली आहे.
Video: हार्दिक पंड्याने आजीसोबत केला ‘पुष्पा’ गाण्यावर डान्स, अल्लू अर्जुन म्हणाला…

कुणालच्या या पोस्टवर अंगद बेदी, दृष्टी धामी, सुजैन, श्वेता बच्चन आणि इतर काही कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कुणालचा जवळचा मित्र हृतिक रोशनने यावर केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुणाल आणि नैनाने २०१५मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या जवळपास सात वर्षांनंतर त्यांनी गूडन्यूज दिली आहे. कुणाल हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो त्याचे खासगी आयुष्य लाइमलाइटपासून नेहमी दूर ठेवतो.