गेल्या १५ दिवसांपासून पंढरीच्या विठूरायाचा गजर सुरु आहे. यावेळी कलाकारांनी देखील वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होत वारीचा आनंद आणि अनुभव घेतला. यंदाच्या वर्षी स्वप्नील जोशी, प्राजक्ता गायकवाड, प्राजक्ता माळी, स्पृहा जोशी यांच्यासह अनेकांनी वारीला भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. कलाकारांनी वारीतील त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासगळ्यात अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ

कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक लहानपणीची आठवण शेअर करतो असं म्हणतं कुशल म्हणाला, मी दहा वर्षांचा होतो. बाबा ऑफीसमधून आले की आमची जेवणं व्हायची आणि ते झोपायची तयारी करायचे, पण आईला जेवणानंतर सगळं आवरावं लागायचं. भांडी घासून, लावून तिला झोपायला वेळ व्हायचा आणि त्यामुळे बाबांनाही झोपायला उशीर व्हायचा. त्यावरून बाबा चिडचिड करायचे. एकदा खूप चिडून बाबा दुसऱ्या खोलीत झोपू लागले, पण मला हे सहनच होईना की आईबाबा माझ्यासोबत एकत्र झोपत नाहीत. मग मी हट्टाला पेटलो आणि माझ्या हट्टाखातर आईबाबा पुन्हा माझ्यासोबत एकत्र झोपायला लागले.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : ऋषी कपूर यांच्या किस करण्यावरून नीतू यांनी केले होते वक्तव्य, म्हणाल्या…

पुढे पंढरपूरला गेल्यानंतर आलेला अनुभव सांगताना कुशल म्हणाला, त्यानंतर मी जेव्हा पंढरपूरला गेलो तेव्हा विठू रूखमाई हे एका मंदिरात जरी असले तरी त्यांचा गाभारा हे वेगळा आहे हे पाहिल्यानंतर ती गोष्ट मला खूप मनाला लागली. हे पाहिल्यानंतर कुशलला त्याच्या लहानपणीची ही गोष्ट आठवली. कुशलने त्याच्या बालपणातील ही आठवण आणि विठू रखुमाईचं वेगवेगळया गाभाऱ्यात असणं याचा अर्थ एका कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विठू सोबत नाही याचं रखुमाईला कसं वाटत असेल हे कुशलने त्याच्या कवितेतून सांगितले आहे.

आणखी वाचा : The Ghost Teaser: नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ चा धमाकेदार टीझर पाहिलात का?

हा व्हिडीओ शेअर करत “हा व्हिडीओ थोडा मोठा आहे पण, माझ्या बालपणीची, आई-बाबांच्या भांडणाची एक छोटी आठवण आणि विठ्ठलाचं पहिल्यांदा घेतलेलं दर्शन. या विषयी आहे. नक्की बघा”, असे कॅप्शन कुशलने दिले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kushal badrike share childhood emotional post related parents relationship and vitthal rukmini dcp
First published on: 11-07-2022 at 13:14 IST