सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी विल स्मिथला ‘किंग रिचर्ड’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर ‘कोटा’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मेमोरियम’मध्ये त्या प्रसिद्ध सेलिब्रिटींची आठवण झाली, ज्यांनी गेल्या वर्षी जगाचा निरोप घेतला. या सेलिब्रिटींमध्ये Sidney Poitier, Betty White, Ivan Reitman, Stephen Sondheim यांच्यासह अनेकांच्या नावांचा समावेश होता, परंतु हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचे नाव नसल्याने भारतातील चाहते संतापले आहेत. आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांची ऑस्कर २०२२ मध्ये आठवण काढली नाही म्हणून नाराजी व्यक्त केली आहे. लता मंगेशकरांनी गाण्यांमध्ये विश्वविक्रम केला आहे. असे असूनही या पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही. दिलीप कुमार यांची आठवणही न केल्याने लोकांनी ऑस्करवर संताप व्यक्त केला आहे.

Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”
Priyadarshini Indalkar
“त्या स्कीटनंतर इतकं हसं झालं”, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील किस्सा; म्हणाली…
woman dies in stampede during pushpa 2 movie
‘पुष्पा-२’ चित्रपटादरम्यान चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू
Shashank Ketkar
“फक्त ७ वर्षं झाली…”, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता शशांक केतकरची पत्नीसाठी खास पोस्ट; म्हणाला…
Marathi actor Chinmay Mandlekar praise of nivedita saraf
“जितकं आपण या अभिनेत्रीला…”, चिन्मय मांडलेकरने निवेदिता सराफांचं भरभरून कौतुक करत केली खंत व्यक्त, म्हणाला…
Madhavi Nimakar
अभिनेत्रीसाठी चाहतीने केली ‘ही’ गोष्ट; पोस्ट शेअर करत म्हणाली, “अतिशय महत्त्वाचा क्षण…”

आणखी वाचा : काश्मिरी पंडित व्यक्तीने बाळासाहेबांविषयी काय सांगितलं?; चिन्मय मांडलेकरने सांगितला ‘तो’ अनुभव

एक नेटकरी ट्वीट करत म्हणाला, “जागतिक विक्रम करणाऱ्या लता मंगेशकर यांचे करोनामुळे निधन झाले, त्यांनी सर्व ऑस्करमध्ये एकत्रितपणे दाखवल्या गेलेल्या चित्रपटांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. तरीही, #Oscars2022 #Inmemoriam मध्ये त्यांचा उल्लेख ही केला नाही. कधीकधी, मला वाटते, वसाहतवाद (Colonialism) अजूनही आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “ऑस्करच्या In memoriam मध्ये लता मंगेशकराचे नाव घेतील अशी अपेक्षा मी केली होती पण…” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी ऑस्कर २०२२ विरोधात संताप व्यक्त केला आहे.”

आणखी वाचा : या चित्रात तुम्ही सगळ्यात आधी काय पाहिले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व

आणखी वाचा : Oscar 2022 : “माझ्या पत्नीचे नाव …”, भडकलेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन सुत्रसंचालकाच्या लगावली कानशिलात

दरम्यान, या आधी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना ऑस्कर सोहळ्यात आदरांजली वाहण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी यांची २०१७ मध्ये झालेल्या ऑस्करमध्ये आदरांजली वाहण्यात आली होती. २०१८ मध्ये श्रीदेवी आणि शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. २०२० मध्ये इरफान खानला श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘मेमोरिअम’मध्ये सुशांत सिंग राजपूत आणि कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली होती.

Story img Loader