झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे तिला विशेष पसंती मिळत आहे. या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहा कामत ही भूमिका साकारत आहे. नुकतंच या मालिकेत नेहा आणि यशचे लग्न पार पडले आहे. त्यामुळे मालिकेत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता लवकरच त्यांच्या आनंदात विरजण पडणार आहे. नेहा आणि यशचा संसार खुलत असतानाचा आता मालिकेत तिच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री होणार आहे.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील एक प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. झी मराठीने अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पॅलेसमध्ये एका व्यक्तीची एंट्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्यक्ती परीसाठी ड्रायव्हरची नोकरी हवी असल्याचे सांगत आहे. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून नेहाचा पहिला नवरा आहे. त्यामुळे आता परी आणि नेहाच्या आयुष्यात येणार अविनाश नावाचं वादळ येणार आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नेहाचा होणार कायापालट, नव्या लूकचा व्हिडीओ चर्चेत
या मालिकेत नेहाच्या पहिल्या नवऱ्याच्या भूमिका अभिनेता निखिल राजेशिर्के साकारणार आहे. निखिल राजेशिर्केने आतापर्यंत अनेक मालिका आणि नाटकात काम केले आहे. तसेच अनेक चित्रपटातही तो झळकला आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री झाल्यानंतर आता पुढे काय होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सिम्मी काकूंना देखील नेहाचा भूतकाळ ठाऊक आहे. त्यामुळे सिम्मी काकू आणि नेहाचा पहिला नवरा हे दोघे मिळून नेहाला त्रास देणार का? नेहा आणि यशच्या संसारात ते दोघेही मिळून अडचणी निर्माण करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.