अभिनेता संतोष जुवेकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ‘मोरया’ चित्रपटातून त्याला प्रसिद्धी मिळाली. तो सोशल मीडियावरही सक्रिय असतो. नुकतंच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे संतोष जुवेकर चर्चेत आला आहे.

संतोष जुवेकरने पोस्टमध्ये “मित्रांनो, अचानक खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट माझ्या आयुष्यात घडत आहे. जिची मी आतुरतेने वाट पाहत होतो ती माझ्या आयुष्यात आली आहे. ज्याबद्दल तुम्ही सुद्धा मला विचारत असायचा की ‘कधी संत्या कधी?’. तर मित्रांनो आमचं सगळं ठरलं आहे. मुहूर्तही ठरला आहे. आता तुमच्याबरोबर हा आनंद शेअर करायचा आहे. म्हणूनच भेटूयात”, असं म्हटलं आहे.  फेसबूक आणि इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून संतोष त्याच्या आयुष्यातील ही गोष्ट चाहत्यांबरोबर शेअर करणार आहे.

हेही वाचा >> “लोकलमध्ये मी नेलपेंट, लिपस्टिक विकायचे अन्…”, विशाखा सुभेदारने शेअर केल्या खडतर प्रवासातील आठवणी

हेही पाहा >> Photos : ‘सैराट’मधील आर्चीचं खरं नाव माहीत आहे का?, रिंकू नाही तर…

संतोष जुवेकरची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टमुळे चाहतेही गोंधळात पडले आहेत. संतोषच्या आयुष्यात नक्की काय घडत आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा >> अलका कुबल, प्रिया बेर्डे यांच्यासह कलाकारांना १० लाख भरण्याचे न्यायालयाचे आदेश; वाचा नेमकं प्रकरण काय?

हेही वाचा >> “लग्न करायचे म्हणून तो रोज माझ्या घरी…”, रिंकूने सांगितला ‘त्या’ चाहत्याचा भयानक किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान संतोषने या पोस्टच्या नंतर काहीच वेळात त्याच्या नवीन चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. ‘३६ गुण’ असं त्याच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठीच त्याने पोस्ट टाकली आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत आहे. समित काक्कड दिग्दर्शित हा चित्रपट ४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. संतोष जुवेकरच्या या नव्या चित्रपटासाठी चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.