छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने काही महिन्यापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र तरी या मालिकेतील सर्वच कलाकार कायमच चर्चेत असतात. या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. या मालिकेत धनश्रीने नंदिता गायकवाड म्हणजे वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. दीर्घकाळ या मालिकेत काम केल्यानंतर आई होणार असल्याने तिने मालिकेतून ब्रेक घेतला. धनश्रीने नुकतंच कोल्हापूरकरांसाठी एक खास पोस्ट केली आहे.
धनश्री ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच धनश्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. यात तुझ्यात जीव रंगला मालिकेतील काही कलाकार दिसत आहेत. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
ग्लॅमरस ‘वहिनीसाहेब’, धनश्री काडगावकरचे प्रेग्नंसीनंतरचे फोटो पाहिलेत का?
“या होत्या माझ्या कोल्हापुर च्या काही आठवणी… कोल्हापूर या शहराने आजपर्यंत इतकं प्रेम दिलय , ईथल्या माणसांनी इतकं प्रेम दिलं आहे.. इथे आलं की घरी आल्या सारखच वाटतं…असच प्रेम राहु दे .. इथुन पुढे सुद्धा तुमच्या प्रेमाची अशिच गरज आहे..”, असे कॅप्शन धनश्रीने दिले आहे.
“हे तुला शोभत नाही”, इन्स्टाग्रामवरील ‘त्या’ रिल व्हिडीओमुळे वहिनीसाहेब ट्रोल
दरम्यान धनश्रीने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. धनश्रीने तिच्या बाळाचे नाव कबीर असे ठेवले आहे. बाळाच्या जन्मानंतर तिचे वजन फारच वाढले होते. मात्र तिने जबरदस्त मेहनत घेत वजन कमी केले आहे. धनश्री ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे.