बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शो मधून घराघरात प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून नेहा शितोळेला ओळखले जाते. नेहा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध पोस्ट शेअर करताना दिसते. नेहाच्या एका चाहतीने प्रचंड मेहनत घेऊन तिच्यासाठी एक सुंदर कलाकृती बनवली आहे. तिने याबाबत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
नेहाने शेअर केलेल्या व्हिडीओत तिचे सुंदर चित्र पाहायला मिळत आहे. तिचे हे चित्र फार अप्रतिम दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना नेहा म्हणाली, “अखेर ती मला भेटली. गेलं दीड वर्ष आमची चुकामूक होत होती.. आज शेवटी भेटायचा योग आला… आज आषाढी एकादशीच्या दिवशी माझ्या ह्या नव्या मैत्रिणीच्या रूपाने रखुमाईचं भेटली जणू… माझी माझ्या स्वतः शी पुन्हा ओळख करून देण्यासाठी… एका नवीन रुपात लवकरच तुमच्या समोर येणार आहे… तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या… हे चित्र काढलं आहे अक्षय सावंत यांनी.”
नेहाचे चाहते कायम काहीतरी भन्नाट गोष्टी करत असतात. नेहाची ही चाहती तिला अनेक दिवस भेटण्याचा प्रयत्न करत होती. मात्र दोघींची वेळ जमत नव्हती. पण आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने तिला हे खास गिफ्ट मिळालं आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंटही केल्या आहेत.
“लोकांनी कितीही टीका केली तरी…”, ‘बिग बॉस’ फेम पराग कान्हेरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
नेहा शितोळे ही सध्या एका नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी नेहा ही सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये दिसली होती. या वेबसीरिजला नुकतंच चार वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने नेहाने एक खास रीलसुद्धा शेअर केलं होतं.