अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. नेहमी फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. या पलीकडे ती सोशल मीडियाद्वारे आपली परखड मत देखील व्यक्त करत असते. शिवाय सोनाली पोस्टवर येणाऱ्या प्रतिक्रिया किंवा ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत असते. नुकतंच तिने एका चाहतीने दिलेल्या सल्ल्यावर चोख उत्तर दिलं आहे.

सोनाली कुलकर्णीने काही तासांपूर्वी तिचे काही दुबईतले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये सोनाली जांभळ्या रंगाच्या साडीत दिसतं आहे. हे फोटो शेअर करत सोनालीने लिहिलं आहे,”Being वेरी मच इंडियन in #dubai”

हेही वाचा – Video: हर्षदा खानविलकर व संग्राम समेळची नवी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस, पहिला प्रोमो आला समोर

सोनालीचे हे सुंदर फोटो पाहून अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “व्वा”, “मस्त”, “गॉर्जियस”, “खतरनाक”, “खूप छान”, “ब्यूटीफूल”, “सोनपरी”, “सोज्वळ सुंदरी”, अशा अनेक प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. पण सोनालीच्या एका चाहतीने तिला चांगला सल्ला दिला आहे. सोनालीची चाहती म्हणाली, ‘काही पण कर बिग बॉसमध्ये नवऱ्याबरोबर जाऊ नकोस.’ यावर सोनाली म्हणाली की, एकटी पण जाणार नाही कधीच.

हेही वाचा – रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटासाठी सौरभ गोखलेची ‘अशी’ झाली होती निवड, अभिनेता किस्सा सांगत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ नेहमीच चर्चेत असतो. सध्या ‘बिग बॉस’चं १७वं पर्व सुरू असून हे पर्व चांगलंच लोकप्रिय ठरलं आहे. या पर्वात काही कपल्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या चाहतीने तिला असा सल्ला दिला आहे.