दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाचा सीक्वेल येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘झिम्मा २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यंदा ‘झिम्मा’मधील ७ बायका इंदू डार्लिंगच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त बाहेर जाणार आहेत. परदेशी या सात जणी मिळून कशी धमाल करणार? ही ट्रिप प्रत्येकीला काय शिकवून जाणार याचा उलगडा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर होणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss 17: सलमान खान भर कार्यक्रमात खानजादीवर भडकला! कतरिना कैफने ‘असा’ शांत केला भाईजानचा राग, व्हिडीओ व्हायरल

‘झिम्मा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळ्याला या चित्रपटाच्या सगळ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने यामध्ये कबीरची भूमिका साकारली आहे. कबीरने ‘झिम्मा २’ मधील बायकांसाठी आणि इंदूच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ट्रिपचं आयोजन केल्याचं चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा’च्या दोन्ही भागांचं दिग्दर्शन अभिनेता हेमंत ढोमेने केलं आहे.

झिम्माच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात दिग्दर्शक हेमंत ढोमेने सिद्धार्थला “या चित्रपटातील तुझी सात जणींपैकी आवडती अभिनेत्री कोण आहे?” असा प्रश्न विचारला. चित्रपटातील सगळ्याच अभिनेत्री सिद्धार्थच्या चांगल्या मैत्रिणी व मावशा असल्याने तो काहीसा गोंधळला. सुरूवातीला त्याने “माझा आवडचा फक्त हेमंत ढोमे” असं दिग्दर्शकाचं नाव सांगून विषय टाळला…पण, त्यानंतर दिगदर्शकाने त्याला प्रांजळपणे खरं उत्तर सांगायला सांगितलं.

हेही वाचा : Video : एकोप्याची दिवाळी! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने राहतो भांडुपच्या चाळीत, शेअर केली दिवाळीची खास झलक

अखेर सिद्धार्थने बराच विचार केल्यावर निर्मिती सावंत आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची नावं घेतली. तसेच दोघींचा अभिनय, कमाल टायमिंग एकंदर सगळ्या गोष्टींचं सिद्धार्थने कौतुक केलं. त्यावर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सुचित्रा बांदेकरांनी माझं काय? असा प्रश्न सिद्धार्थला विचारला. यावर अभिनेत्याने “ताई, तुझ्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. सगळ्याच अभिनेत्रींनी चांगल काम केलंय” असं उत्तर दिलं.

हेही वाचा : ‘सुका सुखी’ नव्हे तर महेश मांजरेकर ‘हे’ ठेवणार होते हॉटेलचे नाव, पण…

View this post on Instagram

A post shared by Zee Music Marathi (@zeemusicmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झिम्मा २’ मध्ये प्रेक्षकांना सिद्धार्थ चांदेकरसह सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे या सात अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसतील.