मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. गेल्या वर्षभरापासून मानसी नाईक ही सातत्याने चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मानसी ही सोशल मीडियावर जास्त सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता एका रील व्हिडीओमुळे मानसी नाईक ट्रोल झाली आहे.

आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. नुकतंच मानसीने ‘भागे रे मन’ या गाण्यावर एक रील व्हिडीओ केला आहे.
आणखी वाचा : “खोटंनाटं उलटंपालटं बोलून वागून…” मानसी नाईकने पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल केले भाष्य, पोस्ट चर्चेत

या व्हिडीओत मानसी ही निळ्या रंगाची साडी परिधान करुन पळताना दिसत आहे. “कुछ तो चाहत रही होंगी, इस बारिश की बूंदो की, वर्ना कौन गिरता है जमीन पर,आसमान तक पहुंचने के बाद”, असे कॅप्शन मानसीने या व्हिडीओला दिले आहे.

मानसी नाईकच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी मानसीला ट्रोलही केले आहे. मानसीने या व्हिडीओवेळी निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. त्याबरोबर तिने पिवळ्या रंगाचा परकर परिधान केला आहे. त्यावरुनच काहींनी तिला ट्रोल केले आहे.

manasi naik troll
मानसी नाईक

आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितलेले नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याचे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काय बाई साडीवर परकर तर मॅच घालायचा”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “मॅचिंग लेहंगा का घातला नाही”, असे तिला विचारले आहे. “पिवळ्या रंगाचा पेटिकोट घातला आहे”, अशी कमेंट एकाने केली आहे. “मानसी, साडीच्या रंगाचा पेटीकोट मिळाला नाही का? पिवळ्या रंगाचा पेटीकोट का परिधान केला आहेस, तुझ्याकडे कमी कपडे नाहीत मग”, अशी कमेंट एकाने केली आहे.