मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीचे नाव नेहमी आघाडीवर घेतले जाते. ती नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच सोनालीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाबद्दलच्या आठवणींनी उजाळा दिला आहे.

सोनाली कुलकर्णी हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचे बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंबरोबर तिने एक कॅप्शनही पोस्ट केली आहे.
आणखी वाचा : “मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा

सोनाली कुलकर्णीची इन्स्टाग्राम पोस्ट

“१५ वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत “बकुळा” म्हणून प्रवेश केला… आणि तुम्ही तुमच्या मनात घर करू दिलं..
तेव्हा पासून आजतागायत दिलेल्या प्रेमाबद्द्ल मी ऋणी आहे आणि कायम राहणार.

बकुळानामदेवघोटाळे या चित्रपटाने, या भूमिकेने खूप दिलं – पुरस्कारांपासून ते स्वतःची ओळख, चित्रपटसृष्टीत पाय रोवून उभं राहण्याची ताकद पासून ते माय बाप रसिक प्रेक्षकांची साथ!

हा १५ वर्षांचा प्रवास पुढची कमीत कमी अजून १५ वर्षं असाच सुरू ठेवण्यासाठी तुमची नेहमी सारखी पाठीवर थाप असूद्या, बास

ता. क. केदार शिंदे सर तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास, माझ्यावर घेतलेली मेहनत आणि दिलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर हा प्रवास मी सुरू करू शकले, याची जाणिव आणि कृतज्ञनता कायम बाळगून ठेवीन. श्री स्वामी समर्थ”, अशी पोस्ट सोनाली कुलकर्णीने शेअर केली आहे.

आणखी वाचा : “आमच्यात वैर…” अमृता खानविलकरचा फोटो पाहताच सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाली कुलकर्णीच्या या पोस्टवर अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहे. तसेच तिचे चाहतेही यावर कमेंट करताना पाहायला मिळत आहे. “अजून १५ फक्त नाही ५० वर्ष तरी तू काम करायला पाहिजे आज अमिताभ बच्चन ८० वर्षी सुध्दा सिनेमा करतात आणि बकुळा मध्ये खूप छान काम केलंस आज मराठी अभिनेत्री सुद्धा टॉप क्लास अभिनेत्री असू शकते. हे तू दाखून दिलं आहेस सोनाली…” अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तिची ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.