सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर हे कपल मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. मिताली-सिद्धार्थ अनेकदा त्यांचे फोटो शेअर करत असतात. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

सिद्धार्थने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मुंबईतील घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून मिताली व सिद्धार्थच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. त्यांच्या घराबाहेर ‘चांदेकर’ अशी नावाची पाटी लावली आहे. प्रवेश केल्यानंतर घरात प्रशस्त हॉल असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच हॉलच्या खिडकीतून मायनगरी मुंबईचं दर्शनही होत आहे.

हेही वाचा>> आधी कॉफी डेट अन् आता थेट लॉंग ड्राइव्ह; अक्षया-हार्दिकच्या रोड ट्रिपचा फोटो व्हायरल

हेही वाचा>>“तो मर्द आहे…” अर्जुन कपूरवरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावलं

घरातील मिताली-सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यातील खास क्षणांचे फोटो लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या बेडरुममध्ये हिरव्या रंगाचं इंटेरिअर केलं आहे. छोट्या मोठ्या डेकोरेटिव्ह वस्तूंनी घरातील एक एक कोपरा त्यांनी सजवल्याचं दिसत आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> सलमान खान रिलेशनशिपमध्ये? ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ व मितालीने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. २४ जानेवारी २०२१ रोजी विवाहबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. अनेकदा ते फोटो शेअर करुन एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात.