दिलखेच अदा, उत्कृष्ट नृत्य, अभिनयाने ९० दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे उषा नाईक. बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या उषा नाईक यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘राखणदार’, ‘माहेरची पाहुणी’, ‘हळदी कुंकू’, ‘सामना’, ‘भुजंग’, ‘पिंजारा’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘लपाछपी’, ‘एक हजाराची नोट’ अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.

जवळपास २ दशकांहून अधिक काळ त्या इंडस्ट्रीत सक्रिय आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. असं असूनही उषा नाईक विविध मुलाखतीमधून इतके वर्ष इंडस्ट्रीत काम करूनही तितकंस कौतुक केलं गेलं नाही, अशी खंत व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच त्यांनी आपल्या लेकाविषयी देखील सांगितलं आहे. तसंच लेकाला या इंडस्ट्रीपासून का दूर ठेवलं? यामागचं कारण उषा नाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – Video: ‘साधी माणसं’ मालिकेत सुप्रिया पाठारेसह झळकणार ‘हे’ अभिनेते, पाहा मालिकेचा नवा जबरदस्त प्रोमो

नुकतीच उषा नाईक यांनी ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलला मुलाखती दिली. यावेळी उषा यांनी लेक ओम विषयी सांगितलं. त्या म्हणाल्या, “मी मुलासाठी कधी ब्रेक घेतला नाही. पण त्याची जेव्हा बारावी होती तेव्हा मी सहा महिने काम केलं नाही. माझ्या मुलाला मी इंडस्ट्रीत कधीच आणलं नाही. कारण मी लहानपणापासून इतके अपमान, इतका त्रास सहन केला आहे. त्यामुळे मी माझ्या मुलाला इंडस्ट्रीच्या सावलीला देखील आणलं नाही. माझा मुलगा म्हणून माझ्या मुलाचा कोणीतरी अपमान करतील, या भीतीपोटी मी माझ्या मुलाला कधीही या इंडस्ट्रीत आणलं नाही. म्हणजे आजही माझा मुलगा ठाण्यात आला तर मी त्याला इथे सेटवर बोलवेनचं, असं नाही आणि माझा मुलगा येणार देखील नाही. माझ्या मुलाला या इंडस्ट्रीमध्ये अजिबात रस नाही.”

हेही वाचा – “मी देशपांडे, जोशी, कुलकर्णी असते तर खूपच कौतुक झालं असतं”, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उषा नाईक यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्या वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. अलीकडे त्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या लोकप्रिय मालिकेत झळकल्या होत्या. या मालिकेत त्यांनी मुंजळाच्या आईची भूमिका साकारली होती.