Metro In Dino Box Office Collection Entertainment News Updates 6 July 2025 : अनुराग बासू दिग्दर्शित ‘लाइफ इन अ मेट्रो’ हा सिनेमा २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर आता तब्बल १८ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘मेट्रो इन दिनो’ हा चित्रपट आला आहे. हा सिनेमा अलीकडच्या काळातील नातेसंबंधांवर भाष्य करतो. चित्रपट समीक्षकांकडून या सिनेमाचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फजल, फातिमा सना शेख, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता आणि अनुपम खेर असे दमदार कलाकार एकत्र झळकले आहेत.

‘मेट्रो इन दिनो’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ३.५ कोटींची कमाई केली आहे. तर, दुसऱ्या ( शनिवार ५ जुलै ) दिवशी या सिनेमाने फक्त ६ कोटींचा गल्ला जमावल्याची माहिती सॅकनिल्कने दिली आहे. त्यामुळे सिनेमाचं एकूण कलेक्शन ९.५ कोटी एवढं झालं आहे.

प्रेक्षकांचा हळुहळू मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता येत्या काही दिवसांत या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषत: या सिनेमाचं संगीत सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे.

Live Updates

Entertainment New Updates 6 July 2025

19:20 (IST) 6 Jul 2025

'थोडं तुझं आणि थोडं माझं' फेम मानसी कुलकर्णी १० वर्षे टेलिव्हिजनपासून का दूर होती? म्हणाली, "माझ्या खासगी आयुष्यात…"

Manasi Kulkarni reveals Why was she away from television for 10 years: "अनपेक्षित आणि दुर्देवी…", मराठी अभिनेत्री नेमकं काय म्हणाली? ...वाचा सविस्तर
18:29 (IST) 6 Jul 2025

"मतदारांनी त्यांना हाकलून लावले", विनोद खन्नांबद्दल राजेश खन्ना म्हणालेले, "हे पाप…"

When Rajesh Khanna attacked Vinod Khanna: दिग्गज अभिनेते राजेश खन्नांनी विनोद खन्नांवर का केलेली टीका? ...सविस्तर वाचा
18:22 (IST) 6 Jul 2025

"मला असहाय्य वाटत होते…", अजय देवगण आणि YRF मधील झालेल्या वादाबद्दल काजोल म्हणाली, "अशा परिस्थितीत…"

Kajol Talks about Ajay Devgn Yashraj Films Fight : २०१२ च्या बॉक्स ऑफिस वादावर काजोलने तिची प्रतिक्रिया दिली आहे. ...सविस्तर वाचा
18:08 (IST) 6 Jul 2025

'पारू' फेम दामिनीने शेअर केला सावित्री आत्यासह व्हिडीओ; अभिनेत्री श्रुतकीर्ती सावंत म्हणाली….

Paaru Fame Actress Sings Song: पारू मालिकेतील दामिनी आणि सावित्री आत्याचे हे गाणे तुम्ही ऐकले का? नेटकरी म्हणाले... ...अधिक वाचा
16:41 (IST) 6 Jul 2025

रितेश देशमुख-प्रीती झिंटाच्या 'त्या' व्हिडीओवर जिनिलियाने सोडले मौन; म्हणाली, "आमच्या दोघांना या गोष्टीचा…"

Genelia reacts on Riteish Deshmukh-Preity Zinta old Viral Video : जिनिलीयाने रितेश देशमुख आणि प्रीती झिंटाच्या 'त्या' व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. ...अधिक वाचा
16:16 (IST) 6 Jul 2025

श्रद्धा कपूरने शेअर केला 'तो' व्हिडीओ; नेटकऱ्यांना दिसला कथित बॉयफ्रेंडचा चेहरा, म्हणाले…

Shraddha Kapoors Latest Dance Video: श्रद्धा कपूरच्या डान्स व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स; काय म्हणाले? घ्या जाणून... ...अधिक वाचा
15:41 (IST) 6 Jul 2025

"आई वडील हे आपल्यासाठी शेवटपर्यंत…", 'नवरी मिळे हिटलरला' फेम प्रसाद लिमये म्हणाला, "त्यांना चुकूनही कधी…"

Prasad Limaye shares post: "माझ्या आयुष्यातील विठ्ठल आणि रखुमाईचा...", अभिनेता काय म्हणाला? ...वाचा सविस्तर
15:11 (IST) 6 Jul 2025

"निरोप घेण्याची वेळ...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यावर बालकलाकार झाली भावुक! म्हणाली, "सई या पात्राने..."

'प्रेमाची गोष्ट' मालिका संपली! बालकलाकार इरा परवडेची भावनिक पोस्ट, काय म्हणाली चिमुकली? जाणून घ्या... ...अधिक वाचा
15:10 (IST) 6 Jul 2025

लांब केस, दाढी अन्…; रणवीर सिंगच्या 'धुरंधर'चा जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

Ranveer Singh Film Dhurandhar Teaser Out : रणवीर सिंहने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. ...सविस्तर बातमी
14:03 (IST) 6 Jul 2025

कपिल शर्माने 'या' देशात पत्नीसह सुरू केला कॅफे; शेअर केले फोटो

Kapil Sharma open The Kaps Cafe: कपिल शर्माच्या कॅफेचे फोटो आणि व्हिडीओ पाहिलेत का? ...अधिक वाचा
13:45 (IST) 6 Jul 2025

Video : एक नंबर, तुझी कंबर! 'पारू' मालिकेतील खलनायिकेचा ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

'पारू' फेम अभिनेत्रीचा संजू राठोडच्या ट्रेंडिंग गाण्यावर भन्नाट डान्स! व्हिडीओ एकदा पाहाच... ...अधिक वाचा
13:23 (IST) 6 Jul 2025

विवेक ओबेरॉयने अभिनयापासून दूर राहूनही एका वर्षात कमावले 'इतके' कोटी; म्हणाला, "पैसे गुंतवण्यात..."

Vivek Oberoi talks about his initial days entrepreneur : विवेक ओबेरॉयने अभिनयाच्या दुनियेपासून स्वतःला दूर केले आहे. ...सविस्तर बातमी
12:07 (IST) 6 Jul 2025

"प्रत्येक जन्मात मी तुला…", पराग त्यागी शेफालीच्या आठवणीत झाला भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाला…

Parag Tyagi Emotional Post For Wife Shefali Jariwala : पराग आणि शेफाली एकमेकांवर खूप प्रेम करत होते ...अधिक वाचा
12:02 (IST) 6 Jul 2025

"सावकाराच्या तुकड्यांवर दोनचार सोडले तर...", मराठी लेखकाची 'ती' पोस्ट चर्चेत; म्हणाले…

Marathi Writer Post : "भाऊ एक झाले की...", मराठी लेखकाने शेअर केली सोशल मीडिया पोस्ट, म्हणाले... ...अधिक वाचा
11:54 (IST) 6 Jul 2025

Video: "नृत्यामधूनी मी ही केली आषाढीची वारी…", 'लाखात एक आमचा दादा' फेम मृण्मयी गोंधळेकरने 'श्रीरंग विठ्ठला' गाण्यावर सादर केले खास नृत्य

Mrunmayee Gondhalekar Dance On occasion of Ashadhi Ekadashi: लाखात एक आमचा दादा फेम तुळजाचा खास डान्स; तुम्ही पाहिलात का? ...अधिक वाचा
11:27 (IST) 6 Jul 2025

लक्ष्मी निवास : "तुम्हाला पळवणार…", लक्ष्मीची होणार कडकलक्ष्मी; नेमकं काय घडणार? नेटकरी म्हणाले, "आक्कासाहेब परत…"

Lakshmi Niwas upcoming twist: आई वडिलांचे बदललेले रुप बघू मुलांना धक्का बसणार; पाहा 'लक्ष्मी निवास'मध्ये काय घडणार? ...वाचा सविस्तर
11:18 (IST) 6 Jul 2025

७० कोटींच्या सी-फेसिंग बंगल्यात राहते रवीना टंडन; एकूण संपत्ती किती? आकडा वाचून थक्क व्हाल

Raveena Tandon sea-facing home : रवीना टंडन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. ...सविस्तर बातमी
10:53 (IST) 6 Jul 2025

मुहूर्त ठरला! 'या' दिवशी सुरू होणार 'चला हवा येऊ द्या'! नव्या पर्वात झळकणार 'हे' कलाकार, कोणत्या मालिकेची वेळ बदलणार?

Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचं नवीन पर्व केव्हा सुरू होणार? नव्या सीझनमध्ये कोण-कोण झळकणार, जाणून घ्या... ...वाचा सविस्तर
09:32 (IST) 6 Jul 2025
Metro In Dino सिनेमा प्रेक्षकांना कसा वाटला?

'मेट्रो इन दिनो' सिनेमाचं संगीत प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं आहे. एक युजर लिहितो, "सिनेमा पाहताना एकदा वेगळाच अनुभव येतो...या चित्रपटामुळे प्रेम, नातेसंबंधांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळेल." तर, दुसरा युजर म्हणतो, "काही ठिकाणी सिनेमा हळुहळू पुढे जातोय असं वाटेल पण, एवढं नक्की सांगतो हा सिनेमा प्रत्येकाने जरूर पाहावा."

https://twitter.com/KattarAaryan/status/1940501019513049220

चित्रपटाच्या म्युझिकने मन जिंकलं

https://twitter.com/jammypants4/status/1941011044505473526

09:24 (IST) 6 Jul 2025

Metro In Dino सिनेमाने २ दिवसांत किती कोटींची कमाई केली?

Metro In Dino Box Office Collection Day 2 : अनुराग बासू दिग्दर्शित 'मेट्रो इन दिनो' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ९.५ कोटी कमावल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे.

पहिला दिवस - ३.५ कोटी

दुसरा दिवस - ६ कोटी

 

'लाइफ इन अ मेट्रो' नंतर तब्बल १८ वर्षांनी, दिग्दर्शक अनुराग बासू प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा 'मेट्रो इन दिनो' हा सिनेमा घेऊन आले आहेत. हा चित्रपट नातेसंबंधांवर भाष्य करतो.