ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या त्यांच्या आगामी ‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्या अनुपम खेर यांच्याबरोबर दिसणार आहेत.
चित्रपटाच्या चर्चेदरम्यान, नीना गुप्ता आयएएनएसशी झालेल्या संभाषणात अनुपम खेर यांच्याबरोबरच्या त्यांच्या नात्याबद्दल बोलल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेत्याबद्दलची त्यांची टिप्पणी आता व्हायरल होत आहे.
हा चित्रपट अनुराग बसू यांच्या २००७ मध्ये आलेल्या ‘लाइफ इन अ मेट्रो’ चित्रपटाचा पुढचा भाग आहे. दोन्ही चित्रपटांची कथा वेगळी आहे. ‘लाइफ इन अ मेट्रो’ प्रमाणेच ‘मेट्रो इन दिनों’मध्येही वेगवेगळ्या जोडप्यांची कथा दाखवण्यात आली आहे. अलीकडेच चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला, जो प्रेक्षकांना आवडला. चित्रपटात नीना आणि अनुपमचा रोमँटिक अँगल पाहायला मिळेल.
नीना गुप्ता यांनी आयएएनएसशी झालेल्या संवादात अनुपम खेर यांच्याबरोबरच्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. अभिनेत्रीने सांगितले की, त्यांचे अनुपम खेर यांच्याबरोबर ‘गिव्ह अँड टेक’ असे नाते आहे. येथे त्यांनी ‘गिव्ह अँड टेक’ याचे अर्थ सांगितले. त्या म्हणाल्या, “दोघेही एकमेकांबरोबर काम करून खूप काही शिकतो आणि एकमेकांना मदतदेखील करतो. या संदर्भात त्या पुढे म्हणाल्या की, एक कलाकार म्हणून त्या दोघांमध्ये चांगले नाते आहे.
नीना गुप्ता म्हणाल्या, मी अनुपम खेर यांच्याबरोबर आधीही काम केले आहे. आम्ही दोघांनी बराच काळ रंगभूमीवर एकत्र काम केले आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणे पूर्णपणे समाधानकारक होते. अभिनेत्रीने सांगितले की, चित्रपटात अनेक भावनिक दृश्ये आहेत. त्या दृश्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी अभिनेत्याने नीना गुप्ता यांना खूप मदत केली आणि अनेक सूचनाही दिल्या. त्यांच्या सूचना खूप प्रभावी आहेत. अनुपम खेर यांच्याबरोबर काम करताना त्यांनी खूप एन्जॉय केला.
चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
‘मेट्रो इन दिनों’ लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट ४ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नीना गुप्ता आणि अनुपम खेर यांच्याव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन, सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, फातिमा सना शेख, अली फजल आणि सास्वता चॅटर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.