दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता नागार्जुन लवकरच 'द घोस्ट' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ६२ वर्षीय नागार्जुनचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ ४९ सेकंदाच्या या टीझरमध्ये नागार्जुन हातात तलवार घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. तर त्याच्या समोर काली लोक असून नागार्जुन तलवारीने त्यांचावर हल्ला करतो. तर आकाशात दिसणारा चंद्र हा रक्तासारखा लाल दिसतोय. आणखी वाचा : 50 Shades Of Gray: “मला बेडवर फेकले अन्…”, इंटिमेट सीन शूटचा डकोटाने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव 'द घोस्ट' हा एक तेलुगु चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण सत्तारू यांनी केले आहे. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'द घोस्ट'मध्ये जॅकलीन फर्नांडिस दिसणार अशा चर्चा होत्या. मात्र, आता या चित्रपटात सोनल चौहानला दिसणार आहे. आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली… https://www.youtube.com/watch?v=40sBTm2Qtzc&t=12s आणखी वाचा : “ढालेपाटलांच्या सूना काही ऐकना”; शिवानीने शेअर केला भन्नाट व्हिडीओ 'द घोस्ट' व्यतिरिक्त, नागार्जुन अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र: भाग १' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातही नागार्जुनची महत्त्वाची भूमिका आहे. आलिया भट्ट, रणबीर कपूर, मौनी रॉय आणि अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत.