…म्हणून महत्वाच्या मुद्द्यांवर सलमान, शाहरुख आणि आमिर खान बोलणं टाळतात; नसीरुद्दीन शाह यांचा खुलासा

फिल्म इंडस्ट्रीला सरकारकडून त्यांच्या विचारांचं समर्थन करणारे सिनेमा बनवण्यासाठी प्रोस्ताहित केलं जातं- नसीरुद्दीन शाह

naseeruddin-shah
(File Photo)

बॉलिवूडचे दिग्गज नेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच नसीरुद्दीन शाह यांनी तालिबानचं समर्थन करणाऱ्या भारतीयांवर निशाणा साधला होता. यानंतर आता नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभेनेता सलमान, शाहरुख आणि आमिर खानवर महत्वाच्या मुद्द्यावर आपलं मत का मांडत नाहीत याचा खुलासा केलाय.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी त्यांना मुस्लिम असूनही फिल्म इंडस्ट्रीत कधीही भेदभावाचा सामाना करावा लागला नसल्याचा खुलास केलाय. सेलिब्रिटींना अनेकदा विविध विषयांवर मतं माडंण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं ते म्हणाले. नसीरुद्दीन शाह म्हणाले, ” त्यांना (सलमान, शाहरुख,आमिर) नंतर होणाऱ्या टीकेची चिंता आहे. कारण गमावण्यासाठी त्यांच्याकडे बरचं काही आहे. यामुळे त्यांचं केवळ आर्थिक नुकसान होणार नाही तर त्यांना सर्वच बाजुंनी त्रास दिला जाईल. हे फक्त जावेद साहेब किंवा माझ्यापर्यंच सीमित नाही तर जो कुणी उजव्या विचारसरणीच्या विरोधात बोलेल त्याची अशीच अवस्था होणार” असं ते म्हणाले.

यासोबतच या मुलाखतीत भारतीय फिल्म इंडस्ट्री ही इस्लामोफोबियाने ग्रासलेली आहे असं नसीरुद्दीन शाह म्हणाले. “फिल्म इंडस्ट्रीला आता सरकारकडून त्यांच्या विचारांचं समर्थन करणारे सिनेमा बनवण्यासाठी प्रोस्ताहित केलं जातं. सरकराच्या कामगिरीचं कौतुक करणारे सिनेमा बनवले जातात. त्यांना फडिंग देखील केलं जातं. तसचं जर ते थेट प्रचार करणारे सिनेमा असतील तर त्यांना क्लीन चीट देण्याचं आश्वासनही सरकारकडून दिलं जातं.” असा खुलासा नसीरुद्दीन शहा यांनी केला.

हे देखील वाचा: सरकारचा प्रचार करणारे सिनेमा बनवले जात आहेत, नाझी जर्मनीत हेच व्हायचं- नसीरुद्दीन शाह

या कामाची तुलना नसूरुद्दीन शाह यांनी नाझी जर्मनीसोबत केली. ते म्हणाले, “नाझी जर्मनीमध्ये असं होत होतं. उत्तम सिनेनिर्मिती करणाऱ्या फिल्म मेकर्सना नाझी विचारसरणीचा प्रचार करणारे सिनेमा बनवण्यासाठी सांगितलं जायचं. माझ्याकडे याचा सबळ पुरावा नसला तरी सध्या ज्या प्रकारेचे मोठे सिनेमा येत आहेत यावरून आपण अंदाज घेऊ शकतो.” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Naseeruddin shah revels why salman shaharukh and amir khan stay silent on issues kpw

ताज्या बातम्या