बॉलीवूड असो अथवा साऊथ, भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार एका चित्रपटासाठी भरमसाठ फी आकारतात. अनेकदा त्यांच्या मानधनाची चर्चाही होते. काही जण एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपये घेतात, तर काही जण २०० कोटी रुपये घेतात. मात्र, ९० च्या दशकात असा एक अभिनेता होता, ज्याने मानधनात अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांसारख्या सुपरस्टार्सनाही मागे टाकले होते. ९० च्या दशकात पहिल्यांदा या अभिनेत्यानेच कोट्यावधी रुपयांची फी घेतली होती. कोण आहे तो अभिनेता? घ्या जाणून…

९० च्या दशकात बॉलीवूड इंडस्ट्रीवर अमिताभ बच्चन यांचा बोलबाला होता, तर साऊथ चित्रपटसृष्टीत रजनीकांत यांचे एकतर्फी राज्य होते. अमिताभ बच्चन व रजनीकांत ९० च्या दशकातील सुपरस्टार असल्यामुळे त्याकाळी ते एका चित्रपटासाठी लाखो रुपयांचे मानधन घ्यायचे. अमिताभ बच्चन एका चित्रपटात काम करण्यासाठी जवळपास ९० लाख रुपये फी आकारायचे. मात्र, दक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांनी मानधनाच्या बाबतीत अमिताभ बच्चन व रजनीकांत यांनाही मागे टाकले. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आपडबांधवुडू’साठी चिरंजीवी यांनी १.२५ कोटी रुपये फी आकारली होती.

हेही वाचा-

‘आपडबांधवुडू’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला. या चित्रपटानंतर चिरंजीवी एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आले. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या अभिनयाच्या जोरावर चिरंजीवी यांनी साऊथ चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले. २०१८ मध्ये चिरंजीवींनी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडण्याची घोषणा करून सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. अभिनयातून ब्रेक घेत चिरंजीवी यांनी राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले.

हेही वाचा- “…तर मी १०० टक्के लग्न करेन”, अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नानंतर मलायका अरोराचे विधान

चिरंजीवी यांच्यापाठोपाठ अनेक कलाकारांनी आपल्या मानधनात वाढ केली. १९९४ मध्ये अभिनेता कमल हासनने एका चित्रपटासाठी एक कोटी रुपये फी आकारण्यास सुरुवात केली. यानंतर १९९६ मध्ये अमिताभ बच्चन यांनीही आपल्या मानधनात वाढ केली. श्रीदेवी ही पहिली अभिनेत्री होती, जिने १९९६ मध्ये एका चित्रपटासाठी एक कोटी रुपयांचे मानधन घेतले होते.