Finally ! ओमने केले चॅलेंज पूर्ण….! एपिसोडचा शेवट मात्र एका मोठ्या ट्विस्टने…

नलू मावशीने दिलेलं चॅलेंज अखेर ओमने पूर्ण तर केलंय. पण एपिसोडच्या शेवटी मात्र चिन्याच्या बाबतीत असं काही घडतं की…

yeu-kashi-tashi-mi-nandayala-marathi-serial-update
(Photo: Instagram@zeemarathi)

झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका आता हळुहळु प्रेक्षकांच्या मनात बसू लागलीय. खूप कमी कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलंय. या मालिकेत सध्या आनंदी आनंद गडे सगळीकडे चोहीकडे, असाच काहीसा माहौल तयार झालेला दिसून येतोय. एककीकडे चिन्याला नोकरी मिळालीय, तर दुसरीकडे नलू दिवसेंदिवस ओमवर इम्प्रेस होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वीच नलूने ओमकडे एक अट घातली होती. १५ दिवसांसाठी स्वतः कष्ट करून गरिबीत जगून २५ हजार रूपये कमवून दाखवलं तर ती दोघांच्या लग्नाला तयार होईल, अशी अट घातली होती. अखेर अनेक संकटांना समोरे जात ओमने ही अट पूर्ण केलीय.

चिन्या आता जबाबदार होऊ लागलाय. या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये चिन्याच्या नोकरीचा पहिला दिवस दाखवण्यात आलाय. सकाळी सकाळी नोकरीचा पहिला दिवस असल्याने खूप गोंधळलेला असतो. नोकरीवर जाण्यासाठी जो शर्ट त्याने इस्त्री करून ठेवलेला असतो तो त्याला व्यवस्थित बसत नाही. तसंच दिवसभराच्या खर्चासाठी त्याच्या वडिलांकडे तो पैसे मागतो. पण त्यांच्याकडे फक्त २० रूपयेच असतात. हे पाहून दादांनी त्याच्यासाठी आणलेलं शर्ट घालण्यासाठी देतात. पण त्याआधी ते लपून त्या शर्टमध्ये चिन्यासाठी ५०० रूपये ठेवतात. दादांनी दिलेलं शर्ट चिन्या खूप आवडीने तो घालतो. हे शर्ट घालताना त्याला खिशामध्ये ५०० रूपयांची नोट मिळते. ती नोट तो दादांना परत करतो. ते पैसे तुझ्याचसाठी आहे असं दादा बोलताता. त्यानंतर चिन्या सगळ्यांचे आशिर्वाद घेऊन नोकरीवर निघतो.

तर दुसरीकडे रस्त्यावर भाजी विकणाऱ्या ओमला समजवण्यासाठी स्विटू येते. इतक्यात एक माणूस ओमला त्याच्याकडून होलसेलमध्ये घेतलेल्या भाजीचे पैसे देतो. त्यानंतर शरद काका सुद्धा त्यांच्याकडून भाजी घेऊन कमवलेले काही पैसे देतात. ओम त्याच्याकडे जमा झालेले एकूण पैसे मोजत असतो. त्याच्याकडे एकूण २० हजार रूपये जमा झाल्याने खूपच आनंदी होतो. हे तो स्विटूला सुद्दा सांगतो. ओमने घेतलेल्या चॅलेंजच्या तो खूप जवळ पोहोचल्याने त्याचा विश्वास आणखी वाढतो. पण नलूने दिलेलं हे चॅलेज पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी ५ हजार रूपयांची गरज असते. त्यातच स्विटू ओमला एक मोठं सरप्राईज देते. ओमने नलू मावशीकडे जे १० हजार रूपये ठेवण्यासाठी दिलेले असतात, ते पैसे स्विटूकडे असतात. हेच पैसे स्विटू ओमला परत करते. ते १० हजार मिळून ओमकडे एकूण ३० हजार रूपये जमा झालेले असतात. या आनंदाच्या भरात तो स्विटूला मिठी मारतो. पण थोड्या वेळाने त्याच्या लक्षात येतं की आपलं स्विटूसोबत भांडण झालेलं आहे. स्विटू सुद्धा त्याची प्रेमाने माफी मागते. त्यानंतर हे दोघेही शरद काकांचा आशिर्वाद घेतात. त्यावेळी ओम त्याच्याकडे असलेल्या ३० हजारांमधून ५ हजार रूपये काकांना देतो. ती त्यांच्या मेहनतीची कमाई असल्याचं सांगत ते पैसे काकांना घेण्यासाठी सांगतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

ओमने नलू मावशीने दिलेलं हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी तो स्विटूच्या घरी जातो. त्यावेळी घरात नलू मावशी नसते. पण घरात असलेल्या बाकी सगळ्यांना ओम ही आनंदाची बातमी सांगतो. त्यानंतर ओम दादांची परवानगी घेऊन स्विटूला घेऊ शकूला ही बातमी सांगण्यासाठी निघतो.

या एपिसोडमध्ये सुरवातीपासून ते मध्यापर्यंत सगळंच आनंदाचा माहौल असला तरी एपिसोडचा शेवट मात्र एक मोठ्या ट्विस्टने होतो. चिन्या ट्रेनमध्ये असताना त्याचा पाठलाग करत गेलेला मोहित लपून चिन्याच्या हाताला पिन टोचवतो. यात चिन्या ट्रेनमधून बाहेर पडताना दाखवण्यात आलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

त्यामूळे आता या मालिकेत पुढे काय होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. चिन्याचं पुढे जाऊन काय होतं? ओमने चॅलेंज पूर्ण केल्यानंतर ओम-स्विटूचं लग्न होणार का? की त्यांच्या लग्नामध्ये आणखी काही विघ्न येणार ? हे आता येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Om completes the challenge in yeu kashi tashi mi nandayala marathi serial episode ends with a big twist prp