‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं होतं आणि नुकताच पार पडलेल्या सोहळ्यात गाण्याने हा पुरस्कार जिंकला आहे. जगभरातुन या चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे जपानसारख्या देशात हा चित्रपट तब्बल २० आठवडे सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही महिन्यांपूर्वी चित्रपटाच्या टीमने जपानला भेट दिली होती. दाक्षिणात्य चित्रपटांची जपानमध्ये क्रेझ आहे. या भेटीदरम्यान चित्रपटातील कलाकार ज्युनियर एनटीआर, रामचरण यांनी जपानी चाहत्यांच्या भेटी घेतल्या. आरआरआरच्या ट्वीटर अकाउंटने अशी माहिती दिली आहे की या चित्रपटाने तब्बल ८० कोटींची कमाई केली आहे. तसेच ते अपेक्षा करत आहेत जपान देशात हा चित्रपट १०० कोटींचा पल्ला गाठेल.

ऑस्कर पटकावल्यानंतर ज्यु. एनटीआर परतला मायदेशी; हजारो चाहत्यांनी केली गर्दी, म्हणाला “प्रत्येक भारतीयांचे…”

‘आरआरआर’ चित्रपट जपानी प्रेक्षकांना प्रचंड आवडलेला दिसत आहे. ट्विटरवर जपानमधील प्रेक्षक प्रतिक्रिया देत या चित्रपटाचे खूप कौतुक करत आहेत. एकाने लिहिले, “‘आरआरआर’ हा वर्षातील सर्वोत्तम चित्रपट आहे…नक्की पहा!” तर दुसऱ्याने लिहिले, “या चित्रपटाची कथा, कथेची मांडणी, संवाद, नातू गाणे हे सगळेच उत्कृष्ट आहे.”

राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ हा चित्रपट २४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. ज्यु. एनटीआर व राम चरण मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने केवळ देशभरात नाही तर जगभरात डंका वाजवला होता. ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oscar award 2023 wining film rrr collectes 80 crores in 20 weekes in japan spg
First published on: 16-03-2023 at 18:50 IST