गेल्या काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध सामाजिक विषयांवर आधारित वेबसीरिज प्रदर्शित होत आहे. आता लवकरच ‘सेक्स्टॅार्शन’ या विषयावर भाष्य करणारी ‘कांड’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचे पहिले पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सेक्स्टॅार्शन म्हणजेच लैंगिक खंडणी. सध्या समाजात खंडणीचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावतोय. समाजातील विविध स्तरातील लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरातीतून, फोनवर, सोशल मीडियावर सेक्स संदर्भातील व्हिडीओज, जाहिराती बघतात आणि एका वेगळ्याच चक्रव्युहात अडकतात. समाजाच्या भीतीपोटी, शरमेखातर या महाजालमध्ये अडकलेले अनेक जण योग्य पाऊल उचलत नाहीत. समाजातील याच भयाण वास्तवावर भाष्य करणारी ‘कांड’ ही वेबसीरिज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा : “मला आजवर वारीला जाण्याचं भाग्यं लाभलं नाही, पण बाबा महाराजांनी…”, संकर्षण कऱ्हाडे झाला भावूक

‘कांड’बद्दल दिग्दर्शक भिमराव काशिनाथ मुडे म्हणतात, ‘’लैंगिक खंडणी हा एक गंभीर विषय आहे. लैंगिक खंडणीला बळी पडलेले अनेकदा लाजेखातर, भीतीमुळे या विषयावर भाष्य करणे टाळतात आणि शेवटी टोकाचा निर्णय घेतात. हे अत्यंत चुकीचे आहे. समाजाला जागरूक करणारी ही वेबसीरिज प्रत्येकाने पाहावी, अशी आहे.”

भिमराव काशिनाथ मुडे दिग्दर्शित ‘कांड’ या वेबसीरिजचे पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या वेबसीरिजेच लेखन मनवा नाईक, हरीश दुधाडे, भिमराव काशिनाथ मुडे यांनी केले आहे. तर प्लॅनेट मराठी आणि मॅन्यूएला क्रिएशन्स निर्मित या वेबसीरिजचे अक्षय विलास बर्दापूरकर आणि मनवा नाईक निर्माते आहेत. यात कोणकोणते कलाकार झळकणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा : “तेजस्विनी पंडित स्वाभिमानी, सोनाली कुलकर्णी उत्तम अभिनेत्री, तर सई ताम्हणकर…”; सिद्धार्थ जाधवचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

”सेक्स्टॅार्शनच्या गुन्ह्यामध्ये मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. समाजात होणारी बदनामी, ही खंडणीदाराची मोठी ताकद असते. हीच ताकद मोडून काढायचा प्रयत्न ‘कांड’मध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाला बळी पडल्यावर न घाबरता काय करावे, हे या वेबसीरिजच्या माध्यमातून दाखवून प्रेक्षकांना सजग राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.” अशी माहिती
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी दिली आहे.