"चांगली संधी वाया घालवली..." 'ए वतन मेरे वतन'च्या टीझरमुळे सारा अली खान ट्रोल | Sara ali khan got trolled for her acting in ae watan mere watan film | Loksatta

“चांगली संधी वाया घालवली…” ‘ए वतन मेरे वतन’च्या टीझरमुळे सारा अली खान ट्रोल

हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. सारा अली खान या चित्रपटात उषा मेहता यांची भूमिका साकारत आहे.

sara ali khan

सारा अली खान ही नेहमीच विविध कारणांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आजच तिच्या ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या छोट्याशा व्हिडीओ क्लिपमधून साराचा या चित्रपटातील लूक प्रेक्षकांसमोर आला. परंतु यातील तिचा अभिनय आणि तिची संवाद प्रेक्षकांना अजिबात आवडलेली नाही. आता या टीझरच्या व्हिडीओवर कमेंट करत अनेक जणांनी तिला ट्रोल केलं आहे.

हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेलं योगदान या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर उलगडलं जाणार आहे. सारा अली खान या चित्रपटात उषा मेहता यांची भूमिका साकारत आहे. आजच या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला. यात सारा अली खान हळूच एका अंधाऱ्या खोलीत येते आणि रेडिओ सदृश यंत्र सुरू करून ती बोलायला सुरू करते. तिच्या बोलण्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘भारत छोडो’ आंदोलनाचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. अशातच तिच्या घराचं दार ठोठावल्याचा आवाज येतो, असं दाखवलं गेलं आहे. परंतु यातील तिची देहबोली नेटकऱ्यांना आवडलेली नाही.

आणखी वाचा : सारा अली खानने केला मुंबई लोकलमधून प्रवास, तिला बघताच सहप्रवाशांनी केलं असं काही की…

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकीकडे साराचे फॅन्स तिचं कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “साराची संवादफेक खूपच निरस वाटत आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तिचा अभिनय अत्यंत भावनाशून्य वाटत आहे. तिच्यासाठी ही एक चांगली संधी होती परंतु तीदेखील सारा वाया घालवेल दिसतंय.” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “सारा आहे घराणेशाहीचं उत्तम उदाहरण आहे.” यासोबतच अनेकांनी तिची तुलना ‘राझी’ चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाशी केली. आलियाने ही भूमिका कैकपटीने चांगली केली असती असं अनेकांनी म्हटलं.

हेही वाचा : Ae Watan Mere Watan Trailer : ‘भारत छोडो’ आंदोलन अन् एका कॉलेजवयीन तरुणीचा संघर्ष; सारा अली खानच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

दरब फारूकी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि कन्नन अय्यर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहे. या चित्रपटाची तारीख अजून नक्की झाली असून हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 18:48 IST
Next Story
Ae Watan Mere Watan Trailer : ‘भारत छोडो’ आंदोलन अन् एका कॉलेजवयीन तरुणीचा संघर्ष; सारा अली खानच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शितsara ali khan