प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे काल (२६ फेब्रुवारीला) निधन झाले. ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज (२७ फेब्रुवारी) पंकज उधास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंकज उधास यांची मुलगी नायाबने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत ही माहिती दिली आहे.

पंकज उधास यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. संगीतप्रेमी व सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी पंकज उधास यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान, आज पंकज उधास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याअगोदर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वरळी हिंदू स्मशानभूमीत दुपारी ३ ते ५ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंकज उधास यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मोदींनी सोशल मीडियावर पंकज उधास यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. “पंकज उधास यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. ते भारतीय संगीताचे दीपस्तंभ होते, त्यांच्या सूरांनी अनेक पिढ्या घडवल्या,” असे मोदींनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

हेही वाचा- “अक्षय कुमार अर्ध्या तासात घरी आला अन्…”, विवेक ओबेरॉयने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाला, “बॉलीवूडमध्ये बहिष्कार…”

पंकज उधास यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. ‘चिठ्ठी आयी है’ या गाण्यामुळे पंकज उधास यांना खरी ओळख मिळाली. गझलसम्राट म्हणून त्यांना जगभरात ओळखले जायचे. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांना २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.