Pushpa 2 Box Office Collection Day 2: बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २: द रुल’ गुरुवारी (५ डिसेंबर रोजी ) जगभरात प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा ‘पुष्पा: द रूल’चा सिक्वेल आहे. तीन वर्षांपूर्वी निर्मात्यांनी दुसऱ्या भागाची घोषणा केल्यापासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पुष्पा 2’ पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे.

‘पुष्पा 2’ ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग जबरदस्त झाले होते. तसेच प्रिमिअर शोला देखील चांगला प्रतिसाद मिळाला. सिनेमागृहात आल्यानंतर या चित्रपटाने ग्रँड ओपनिंग केली. नॉन हॉलिडे दिवस असूनही गुरुवारी चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगले राहिले. ‘पुष्पा 2’ च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

हेही वाचा – पुष्पा-श्रीवल्लीचा रोमान्स घरबसल्या पाहता येणार, Pushpa 2 ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

‘पुष्पा 2’ पहिल्या दिवसाची कमाई

इंडस्ट्री ट्रॅकर सॅल्कनिकच्या वृत्तानुसार, ‘पुष्पा 2’ ने बुधवारी प्रिमिअर शोमधून १० कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी भारतात तब्बल १७५.१ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. यामध्ये तेलुगू भाषेत सर्वाधिक ९५.१ कोटी, हिंदीमध्ये ६७ कोटी, तामिळ भाषेत सात कोटी, कन्नड भाषेत एक कोटी आणि मल्याळम भाषेत या चित्रपटाने पाच कोटी रुपये कमावले. या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे जगभरातील कलेक्शन २९४ कोटी राहिले.

हेही वाचा – Pushpa 2 च्या निर्मात्यांना मोठा धक्का; ‘या’ प्लॅटफॉर्म्सवर ऑनलाइन लीक झाला चित्रपट

‘पुष्पा 2’चे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन

सॅल्कनिकच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने भारतात ९०.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापैकी तेलुगूमध्ये २७.१, हिंदीमध्ये ५५ कोटी, तमिळमध्ये ५.५ कोटी, कन्नड ६० लाख आणि मल्याळमध्ये १.९ कोटी रुपये कमावले. दोन दिवसात चित्रपटाने २६५ कोटी कमावले व प्रिमिअर शोमध्ये १० कोटी असे एकूण २७५ कोटी रुपये चित्रपटाने भारतात कमावले आहेत. जगभरात चित्रपटाची कमाई ४०० कोटींहून जास्त झाली आहे. चित्रपटाच्या टीमने अधिकृत आकडे जाहीर केल्यावर सिनेमाचे दुसऱ्या दिवसाचे वर्ल्डवाईड कलेक्शन किती, ते स्पष्ट होईल.

Pushpa 2 Movie Review : अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाचा चित्रपट कसा आहे? सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षक म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ चित्रपटाची निर्मिती मैथ्री मूव्ही मेकर्सने केली आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानासह मल्याळम अभिनेता फहाद फासिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘पुष्पा 2’ हा अल्लू अर्जुनच्या २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा सिक्वेल आहे. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.