अभिनेत्री राधिका आपटे आपल्या अभिनयाने आणि हटके लूक्सने प्रेक्षकांची मने जिंकत असते. ती सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते आणि आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते. ती तिचे वेगवेगळे फोटो सतत शेअर करत असते. आत्ताही तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे.

कसल्यातरी चित्रीकऱणादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत राधिका चिल करताना दिसत आहे. तिने मध्येच आपला गाऊन लुंगीसारखा उचलून वर धरला आहे. या व्हिडिओत तिने गुलाबी रंगाचा सुंदर आणि लांब सिल्कचा गाऊन घातला आहे. ती चित्रीकरण सुरु होण्याची वाट पाहत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनही दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

यात ती म्हणते, “लॉकडाऊन पूर्वीचं चित्रीकरण” आणि त्यासोबत तिने सॅड इमोजीही शेअर केला आहे. त्यासोबत तिने #lockdown2021 #letsdothisthing असे हॅशटॅगही दिले आहेत.

राधिकाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना फारच आवडलेला दिसत आहे. तिचे काही चाहते तिचा व्हिडिओ किती विनोदी आहे यावर बोलत आहेत, तर काही चाहत्यांनी तिच्या ड्रेसवर कमेंट्स केल्या आहेत. बऱ्याच जणांना तिचा ड्रेस फारच आवडला आहे. अनेक चाहत्यांना तिचं ड्रेसला लुंगीसारखं हाताळणं फार आवडलं आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर हार्ट, फायर लव्ह असे इमोजीही कमेंट केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधिकाने हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतंच तिची ‘ओके कम्प्युटर’ ही वेबसीरीज २६ मार्च रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली होती.