Video: ‘जान लगा के देश के लिए खेलना’, रणवीर सिंगच्या 83चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

’83’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

83, ranveer singh, ranveer singh 83, 83 movie trailer, 83 movie trailer news, 83 movie trailer news in marathi, 83 the film, 83 film news, 83 film, 83 world cup, 83 world cup film,

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. तो पाहिल्यावर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच अंगावर शहारे आणणारा ’83’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

लॉर्ड्स मैदानात भारतीय संघाने रचलेला इतिहास पुन्हा नव्याने जगण्याची संधी ’83’ या चित्रपटाद्वारे मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. ३ मिनिटे ४९ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये १९८३ साली झालेल्या लंडनमधील लॉर्ड्स मैदानातील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना दाखवण्यात आला आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय टीमचे कर्णधार कपिल देव यांनी केलेली तयारी दाखवण्यात आली आहे. तसेच भारतीय संघाला ज्या प्रकारे वागणूक देण्यात आली ते दाखवणारा हा ट्रेलर आहे.
83 Teaser: इतिहास पुन्हा नव्याने जगण्याची संधी, पाहा अंगावर शहारे आणणारा टीझर

’83’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या पूर्वी हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. मात्र करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

’83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ranveer singh kapil dev deepika padukone 83 trailer out avb

ताज्या बातम्या