बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर कमी सक्रिय असते. तरी देखील रिया कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. रियाने नुकताच तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत रियाने काळ्या रंगाची ब्रालेट परिधान केली आहे. त्यासोबत काळ्या रंगाच टॉप आणि पॅन्ट रियाने परिधान केली आहे. हा फोटो शेअर करत ‘पिस आऊट’ हे कॅप्शन देत. ‘नारी शक्ती’ हे हॅशटॅग रियाने दिलं आहे. तिच्या या फोटोवर सेलिब्रिटींपासून नेटकऱ्यांपर्यंत अनेकांनी कमेंट करत तिची स्तुती केली आहे.

आणखी वाचा : “…म्हणून आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय”; ‘तारक मेहता…’फेम मुनमुन संतापली

आणखी वाचा : ‘हे टी-शर्ट २०० रुपयांना लिंकिंग रोडला मिळेल’, कपड्यांमुळे करीना कपूर झाली ट्रोल

दरम्यान, रिया गेल्या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘चेहरे’ या चित्रपटात दिसली होती. रुमी जाफरी दिग्दर्शित यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रिया व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी, सिद्धांत कपूर, अन्नू कपूर, धृतिमान चॅटर्जी आणि रघुवीर यादव मुख्य भूमिकेत आहेत.