रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ सिनेमा नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतर आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. तर अजय देवगण आणि रणवीर सिंह कॅमिओ रोलमध्ये आहेत. रोहित शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिनेमाशी संबधीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी सर्व कलाकारांच्या तारखा कशी जुळवल्या तसचं सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित न करत थिएटरमध्येच का प्रदर्शित केला? या प्रश्नांची उत्तर त्याने दिली आहेत.

रोहितने नुकतीच क्विन्ट या वेब पोर्टलला मुलाखत दिलीय. या मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तर देत असताना रोहितने एका महत्वाच्या मुद्द्यावर त्याचं मत व्यक्त केलंय. सिनेमामध्ये ‘चांगले मुस्लिम आणि वाईट मुस्लिम’ अशा दोन्ही बाजू दाखवल्या गेल्या आहेत. कथेबद्दल विचारल्या गेलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित म्हणाला, “याआधी जेव्हा माझ्या सिनेमात हिंदू खलनायक दाखवले गेले तेव्हा हा प्रश्न का उपस्थित करण्यात आला नाही?”

“मी देखील अगदी अशीच होते”; अनुष्का शर्माने सांगितला मुलीमधील ‘तो’ गुण

क्विंटला दिलेल्या मुलाखतीत रोहित म्हणाला,”जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की जयकांत शिर्के हिंदू होता आणि मराठी होता. तसचं दुसऱ्या सिनेमातही हिंदू व्हिलन होता. सिम्बामध्येही मराठी म्हणजेच हिंदू व्हिलन होता. या तीनही नकारात्मक भूमिका हिंदू होत्या. मग तेव्हा समस्या का नव्हती कुणाला.?” असं रोहित म्हणाला.

काही वृत्तामध्ये सूर्यवंशी सिनेमात चांगले मुस्लिम आणि वाईट मुस्लिम अशी कथा दाखवण्यात आल्याचं सांगण्यात आलं असून ते पूर्णपणे चुकीचं असल्याचं रोहित म्हणाला. सिनेमा तयार करताना आम्ही असा काही विचारच करतं नाही तर लोक असा विचार का करतात? असा सवाल त्याने उपस्थित केलाय. तसचं एखाद्या वाईट किंवा चांगल्या व्यक्तीचा त्याच्या जातीशी संबध लावला जाऊ नये असंही तो म्हणाला.

सूयर्यवंशी सिनेमा २०२० सालामध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र करोना महामारीमुळे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. थिएटर रिलीजबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “ही एक दीर्घ लढाई होती,विशेषत: जेव्हा तुम्हाला ओटीटी कडून चांगल्या ऑफर मिळत असतात. पण माझ्यासाठी सूर्यवंशीला थिएटर रिलीजचीच गरज होती.” असं तो म्हणाला.