दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला. त्या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना धक्काच बसला होता. पण घटस्फोटानंतर त्या दोघांनी त्यांच्या प्रोफेशनल लाईफवर लक्ष दिले. आता नागा चैतन्यविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. समांथासोबत घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य एका अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर आता नागा चैतन्यची पूर्वश्रमीची पत्नी सामंथा रुथ प्रभुने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, नागा चैतन्य सध्या दाक्षिणात्य अभिनेता शोभिता धुलीपासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना एकत्र हैदराबादमध्ये स्पॉट करण्यात आले. हैदराबाद येथे नागाला नवा फ्लॅट मिळणार आहे. त्या फ्लॅटचं सध्या काम सुरू असून तो पाहण्यासाठी नागा आणि शोभिता दोघे गेले होते. शोभिता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मेजर’ या चित्रपटात होती. एवढच काय तर नागा चैतन्य आणि शोभिताला हैदराबादच्या हॉटेलमध्ये अनेकदा स्पॉट केलं आहे. त्यानंतर आता नागा चैतन्य आणि सामंथाचं घटस्फोटाचं कारण देखील शोभिताच असल्याचं देखील बोललं जात आहे.

नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना यावर सामंथा प्रभुचं ट्वीट चर्चेत आलं आहे. सामंथानं नागा चैतन्यच्या अफेअरचं वृत्त रिट्वीट करताना लिहिलं, “एका मुलीबद्दल काही अफवा असेल तर ती नक्कीच खरी आहे. जर मुलाच्याबाबतीत काही अफवा असेल तर मग ती त्या मुलीने पसरवली असणार. समजूतदार व्हा मित्रांनो. ज्या दोघांबद्दल बोललं जातंय ते दोघं त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. आता तुम्ही सर्वांनी देखील हा विषय सोडून आयुष्यात पुढे जायला हवं. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्यायला हवं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान समांथा आणि नागा चैतन्य यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये घटस्फोट घेतला. लग्नाच्या ४ वर्षांनी दोघांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या चाहत्यांसाठी फार धक्कादायक होता. सोशल मीडियावर आजही दोघांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. नागा चैतन्य आता आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर समंथा ‘शंकुतलम’ आणि ‘यशोदा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.