scorecardresearch

समांथाच्या चाहत्यांसाठी खूशखबर, आजारामुळे नव्हे तर ‘या’ कारणासाठी गेली अमेरिकेत

नुकतंच तिच्या मॅनेजरने या सर्व वृत्तांचे खंडन केले असून त्या अफवा असल्याचे सांगितले आहे.

समांथाच्या चाहत्यांसाठी खूशखबर, आजारामुळे नव्हे तर ‘या’ कारणासाठी गेली अमेरिकेत

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती तिचा आगामी ‘खूशी’ या चित्रपटाचे शूटींग करत आहे. मात्र अचानक तिने या शूटींगदरम्यान ब्रेक घेतला आहे. एका गंभीर आजारामुळे समांथाने शूटिंगमधून ब्रेक घेतला असल्याचे सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे ती सोशल मीडियावरही सक्रीय नसल्याचे पाहायला मिळत आहे. तिला त्वचेसंबंधित एक आजार झाला असून त्याच्या उपचारासाठी परदेशात गेल्याचे सांगितले जात आहे. पण नुकतंच तिच्या मॅनेजरने या सर्व वृत्तांचे खंडन केले असून त्या अफवा असल्याचे सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, समांथाला ही त्वचेशी संबंधित आजाराने त्रस्त आहे. ‘पॉलीमॉर्फ्स लाइट एरप्शन’ असे या आजाराचे नाव आहे. हा आजार सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात आल्यामुळे होतो. या आजारामुळे समांथा ही कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही.
आणखी वाचा : नागाचैतन्यशी घटस्फोटानंतर समांथा पुन्हा अडकणार लग्नबंधनात? घेतला मोठा निर्णय

नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमातही ती कुठेच दिसली नाही. त्यामुळे ती उपचारासाठी परदेशात गेल्याचे सांगत आहेत. डॉक्टरांनी तिला गर्दीत जाण्यास मनाई केली आहे. यामुळे तिच्या आगामी चित्रपटाचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आल्याचे बोललं जात आहे. पण या सर्व चर्चांदरम्यान नुकतंच समांथाच्या मॅनेजरने या सर्व केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे. यामुळे समांथाचे चाहते आनंदी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समांथा ही सध्या अमेरिकेत असल्याचे वृत्त खरं आहे. ‘सिटाडेल’ या तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी ती तिथे गेली आहे. समांथा ही अमेरिकेत सिटाडेलच्या प्रोजेक्टसाठी गेली आहे. ती तिच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी शारीरिकदृष्ट्या तयार होत आहे. यासाठी ती फार काटेकोरपणे फिटनेस आणि लाइफस्टाइल फॉलो करत आहे. ती तिथे मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या एका प्रसिद्ध तज्ञाकडून अॅक्शनचे प्रशिक्षण घेत आहे.

आणखी वाचा : समांथा करतेय ‘या’ गंभीर आजाराचा सामना, जाणून घ्या त्याच्याबद्दल

‘सिटाडेल’ हा सायन्स आणि फिक्शन स्वरुपातील चित्रपट आहे. ‘सिटाडेल’मध्ये ती प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडनसोबत दिसणार आहे. विशेष म्हणजे यात अभिनेता वरुण धवनही झळकणार आहे. पहिल्यांदाच समांथा, वरुण, प्रियांका आणि रिचर्ड हे चौघेजण एकत्र चित्रपटात झळकणार आहेत. त्यामुळे यांच्या चाहत्यांसह सर्वच प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या