‘काजोलसोबत काम करू नको कारण…’, शाहरुखने दिला होता आमिरला सल्ला

अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करूनही शाहरुखने आमिरला हा सल्ला का दिला होता, याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.

kajol, shah rukh khan, aamir khan,
काजोल आज तिचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस आहे. आज काजोल ४७ वर्षांची झाली आहे. काजोलने आज पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, काजोल आणि बॉलिवूडच किंग खान शाहरुखची जोडी ही सुपरहिट जोड्यांपैकी एक आहे. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्रीने एकेकाळी रुपेरी पडदा गाजवला होता. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. एवढे चित्रपट एकत्र केल्यानंतर ही शाहरुखने आमिरला काजोलसोबत काम न करण्याचा सल्ला दिला होता.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘दिलवाले’ चित्रपटाच्या वेळी शाहरुखची मुलाखत घेण्यात आली. तेव्हा त्याने ‘बाजीगर’ चित्रपटाच्या वेळचा किस्सा सांगितला. “जेव्हा मी काजोलसोबत ‘बाजीगर’ चित्रपटात काम करत होतो तेव्हा आमिर खानने मला काजोल विषयी विचारले होते. त्याला काजोलसोबत काम करायचे होते. ‘ती चांगली अभिनेत्री नाही. तिचे कामावर लक्ष नाही. तू तिच्यासोबत काम करु शकणार नाही’ असे मी आमिरला सांगितले होते”, असे शाहरुख म्हणाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक

त्यानंतर शाहरुखने कजोलमधील टॅलेंट पाहिले. त्याने आमिरला पुन्हा फोन केला आणि काजोलच्या अभिनयाची प्रशंसा केली. ‘मी पुन्हा आमिरला फोन केला आणि त्याला आधी सांगितलेल्या गोष्टींवर पुन्हा बोललो. मला माहित नव्हते ती स्क्रिनवर जादू करते’, असे शाहरुख म्हणाला.

आणखी वाचा : सोनाली कुलकर्णीने शेअर केला बिकिनी लूक, फोटो व्हायरल

तसेच शाहरुखने एका मुलाखमध्ये त्याची मुलगी सुहाना खानने काजोलकडून अभिनयाचे धडे घ्यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. शाहरुख म्हणाला, काजोल एक अतिशय चांगली अभिनेत्री आहे. माझ्या मुलीची अभिनेत्री होण्याची इच्छा आहे. तिने काजोलकडून अभिनयाचे धडे घ्यावेत अशी माझी इच्छा आहे.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shah rukh khan told aamir khan do not worl with kajol dcp

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या