प्रसिद्ध उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली. कुद्रा हे पॉर्न फिल्म निर्मिती रॅकेटचे प्रमुख सुत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. राज यांच्या अटकेनंतर बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. कुंद्रा यांच्या अटकेवर वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अगदी बॉलिवूड सेलिब्रिटींपासून नेत्यांपर्यंत सर्वांनीच यावर प्रतिक्रिया दिलेल्या असतानाच आता लोकप्रिय हास्यकलाकार राजू श्रीवास्तवनेही राज कुंद्रांच्या अटकेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. “राज कुंद्रांसारखे लोक पैसा कमावण्यासाठी काहीही करु शकतात,” असं राजू श्रीवास्तवने म्हटलं आहे.

“अशा लोकांना देशाच्या संस्कृतीसंदर्भात काही देणघेण नसतं. वेब सीरीजमध्ये आजकाल फार अश्लीलता दाखवली जाते. मी यापूर्वीही याचा विरोध केलाय. आपण सर्वांनी या लोकांवर सामाजिक बहिष्कार म्हणजेच सोशल बॉयकॉट करण्याची गरज आहे. या लोकांना कुठेही बोलवण्यात येऊ नये,” असं मत राजू श्रीवास्तवने व्यक्त केलं आहे.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

“आपल्याकडे वेबसिरीजमध्ये फार अश्लीलता दाखवली जाते. भोजपुरी चित्रपटांमध्येही अश्लीलता दाखवली जाते. डबल मीनिंग असणारे संवाद, अश्लील गाणी यामध्ये असतात. याविरोधात मी आवाज उठवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रारही केली आहे. त्यातच आता राज कुद्रांचं हे घाणेरडं कृत्य समोर आलं आहे. आता लोक पैसा कमवण्यासाठी स्वत:चा धर्म आणि इमानसुद्धा विकायला तयार झाल्यासारखं वाटतंय. काहीही दाखवलं जात आहे. देशाची सभ्यता आणि संस्कार यांच्याशी या लोकांनी काहीच देणघेणं नाहीय. यांना केवळ पैसे कमावायचे आहेत. आपल्या घरी फार पैसा आला पाहिजे एवढच यांचं उद्दीष्ट आहे,” अशा शब्दांमध्ये राजूने कुंद्रा यांना फटकारलं आहे.

नक्की वाचा >> “Porn Vs Prostitution वर बोलूयात, कॅमेरासमोरच्या सेक्ससाठी…”; राज कुंद्रांचं ‘ते’ ट्विट व्हायरल

“यासाठी आपल्यासारखे लोकही जबाबदार आहेत. कायदा तर आपलं काम करेल. मात्र सामाजिक स्वरुपात आपण यांचा बहिष्कार केला पाहिजे. आपण या कलाकारांना लग्नांना, बर्थ डे पार्ट्यांना बोलवतो. बॉलिवूडमधील लोक तर अशा प्रकरणांवर शांतच राहतात. पोलीस कायद्यानुसार शिक्षा देतीलच पण बॉलिवूडमधील लोकांनी समोर येऊन अशा लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे,” असं मत राजू श्रीवास्तवने व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> “राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी रामदेव बाबांचे शिष्य, तरीही…”; अध्यात्मिक गुरुंनी लगावला टोला

अशाप्रकारे शूट केल्या जायच्या पॉर्न

दरम्यान, मुंबई पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी राज कुंद्रा प्रकरणासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे रॅकेट कसं चालायचं याबद्दल माहिती दिली. चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नवोदित महिला कलाकारांना वेब सीरिजमध्ये किंवा एखाद्या शॉर्ट स्टोरीजमध्ये ब्रेक देतो असं सांगून बोलावलं जायचं. ऑडिशन, शॉट्स घेण्यासाठी बोलावलं जायचं. त्यात बोल्ड सीन्स करावे लागतील असं सांगितलं जायचं. नंतर त्या बोल्ड सीन्सचं पर्यवसान सेमी न्यूड आणि न्यूड सीन्समध्ये व्हायचं. त्यावर या महिला कलाकार आक्षेप घ्यायच्या. अशाच काही महिला कलाकारांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन मढमधील बंगल्यावर फेब्रुवारीत छापा टाकण्यात आलेला.