scorecardresearch

शुबमन गिलच्या द्विशतकाशी ज्युनिअर एनटीआरचं कनेक्शन काय? ‘त्या’ पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव

Shubman Gill Double Century: शुबमन गिलच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस

शुबमन गिलच्या द्विशतकाशी ज्युनिअर एनटीआरचं कनेक्शन काय? ‘त्या’ पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव
शुबमन गिलचं द्विशतक. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Double Century of Shubman Gill: भारत-न्यूझीलंड संघांत खेळवल्या जात असलेल्या पहिल्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुबमन गिलने १४९ चेंडूत २०८ धावा करत विक्रमी द्विशतक झळकावले. शुबमन गिलने द्विशतक झळकावल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शुबमनने द्विशतक झळकावल्यानंतर त्याच्या सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. भारत-न्यूझीलंड सामन्याच्या एक दिवस आधीच इंडियन क्रिकेट टीमने दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरची भेट घेतली होती. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शुबमननेही ज्युनिअर एनटीआरबरोबरचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता.

हेही वाचा>> IND vs NZ 1st ODI: शुबमन गिलने रोहित-इशानचा मोडला विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील आठवा फलंदाज

हेही पाहा>> रितेश देशमुख-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या

शुबमनच्या ज्युनिअर एनटीआरबरोबरच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ज्युनिअर एनटीआर शुबमनसाठी लकी असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. “ज्युनिअर एनटीआरला माहीत होतं बेस्ट लक बोलण्याचा परिणाम २००”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “एनटीआरमुळे २०० रन झाले”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. काहींनी या पोस्टवर “जय एनटीआर”, अशा कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला कतरिना कैफबरोबर करायचा होता रोमान्स, इच्छा व्यक्त करत म्हणाली…

शुबमन गिल हा वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज व जगातील आठवा फलंदाज ठरला आहे. वयाच्या २३ व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता, ज्याने वयाच्या २४ व्या वर्षी बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 19:55 IST

संबंधित बातम्या