छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ हा लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावणार होत्या. तिथे त्या त्यांच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावणार होत्या. मात्र, काही कारणांमुळे तो एपिसोड रद्द करण्यात आला असल्याचे म्हटले जाते.

‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार, स्मृती इराणी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये त्यांच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी जात होत्या. एपिसोडचे चित्रीकरण आज म्हणजे २४ नोव्हेंबर होणार होते, परंतू ते झाले नाही. जेव्हा स्मृती इराणी गेटवर पोहोचल्या तेव्हा गेटकीपरने त्यांना ओळखले नाही, असे सांगितले जात आहे. स्मृती यांच्या ड्रायव्हरला सेटवर असलेल्या गेटकीपरने थांबवून आत जाण्यास नकार दिला. ड्रायव्हर आणि गेटकीपरमध्ये वाद झाल्याचे वृत्त आहे. गेटकीपर म्हणाला, “आत पाठवण्याची ऑर्डर मिळाली नाही.” यानंतर संतापलेल्या स्मृती शूट न करताच परतल्याचे म्हटले जाते.

आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गोष्टीविषयी ना स्मृती यांनी काही स्पष्टीकरण दिलं नाही कपिलने यावर काही वक्तव्यं केलं आहे. दरम्यान, स्मृती इराणी यांच्या पुस्तकाच नाव ‘लाल सलाम’ आहे. आता हा एपिसोड कधी शूट होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.