‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सर्वच मालिका या कायमच चर्चेत असतात. तसेच टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असतात. या मालिकांमधील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात. मग ती अरुधंती असो किंवा दीपा, सायली असो. या प्रमुख भूमिका विशेषतः प्रेक्षकांची मन जिंकतात. पण हीच प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री बदलली तर प्रेक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागतात. असाच काहीसा बदल ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘पिंकीचा विजय असो’मध्ये होणार आहे.

हेही वाचा – कधीही न पाहिलेल्या भूमिकेत झळकणार भरत जाधव; ‘हे’ नवे नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पिकींची भूमिका कोण साकारणार हे मात्र स्पष्ट झालं आहे.

नुकत्याच बंद झालेल्या ‘लोकमान्य’ मालिकेतील अभिनेत्री आरती मोरे पिंकीच्या भूमिकेत दिसणार आहे. आरती ही ‘लोकमान्य’ मालिकेत यशोदाबाई आगरकर यांच्या भूमिकेत झळकली होती.

हेही वाचा – “दीड वर्षापूर्वीच्या ‘त्या’ दिवशी…”; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, “काट लो जुबान…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आरतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं बऱ्याच मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. ‘जय मल्हार’, ‘अस्मिता’, ‘दिल दोस्ती दोबारा’, ‘गुलमोहर’ या लोकप्रिय मालिकांमध्ये ती पाहायला मिळाली होती. ‘दादा एक गूड न्यूज आहे’ या नाटकातली तिची भूमिका विशेष गाजली. आरतीला गेल्या वर्षी ‘कलादर्पण २०२२’चा सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.