अभिनेत्री वंदना गुप्ते या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक दशक त्या त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आल्या आहेत. त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे ही चर्चेत असतात. तर आता त्यांनी लग्नापूर्वीचे काही किस्से शेअर केले आहेत.

नुकतीच त्यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या. त्यांचे पती शिरीष लग्नापूर्वी पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या घरी त्यांच्या घरच्यांना भेटायला आले तेव्हा त्यांच्या वडिलांची प्रतिक्रिया काय होती, हे वंदना गुप्ते यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा : Video: ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी पुन्हा एकदा बांधली लग्नगाठ; म्हणाल्या, “सर्वाधिक आनंद याचा होता की…”

त्या म्हणाल्या, “मी जेव्हा बहिणींना सांगितलं की शिरीषने मला लग्नासाठी मागणी घातली आहे तेव्हा माझ्या बहिणींनी आमच्या नात्याला हसत हसत पाठिंबा दिला. त्यानंतर मग मी घरी सांगितलं. तेव्हा वडील म्हणाले की त्याला घरी येऊदे. मग शिरीष एकदा घरी भेटायला आला. तो आमच्या घरी जेव्हा पहिल्यांदा भेटायला आला तेव्हा माझे वडील त्याला त्यांच्या स्टडीमध्ये घेऊन गेले. त्या स्टडीच्या दरवाजाच्या मागे मोठा झाडूचा बांबू ठेवला होता. तेव्हा शिरीष इतका घाबरला की, काय होतंय आता माझं असं त्याला वाटू लागलं होतं. पण वडिलांनी त्याची छान मुलाखत घेतली आणि आमच्या नात्याला परवानगी दिली.”

हेही वाचा : “मी राज ठाकरे-शर्मिलाची प्रेमपत्रं पोहोचवायचे…,” वंदना गुप्ते यांचा खुलासा, मजेशीर किस्सा शेअर करत म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वंदना गुप्ते नुकत्याच ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. हा चित्रपट आजही चित्रपटगृहात खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 75 हुन अधिक कोटींची कमाई केली आहे.