scorecardresearch

Premium

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये रंगणार राजेशाही विवाह सोहळा, अक्षराने घातलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष

अक्षरा आणि अधिपतीच्या लग्न सोहळ्यातले त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांचं लूक चांगलाच चर्चेत आला आहे.

Akshara Mangalsutra

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. नुकताच अक्षरा आणि अधिपती यांचा साखरपुडा दिमाखात पार पडला. तर आता या दोघांचं लग्न राजेशाही थाटात संपन्न होत आहे. या त्यांच्या लग्न सोहळ्यातले त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून लग्नातील त्या दोघांचा लूक चांगलाच चर्चेत आला आहे.

या लग्नासाठी त्यांनी पारंपारिक लुक केला आहे. अक्षराने हिरव्या रंगाची नऊवारी साडी त्यावर पारंपारिक दागिने घातले आहेत. तर अधिपतीने निळ्या रंगाचा झब्बा कुर्ता आणि त्यावर हिरव्या रंगाच्या पैठणीचा फेटा बांधला आहे. पण या सगळ्यामध्ये अक्षराच्या मंगळसूत्राने सगळयांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

hrishikesh shelar
Video: नवरा असावा तर असा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’तील ‘अधिपती’च्या वागण्यावर भारावले प्रेक्षक, जाणून घ्या कारण
N D Studio
नितीन देसाई यांच्या N.D Studio मध्ये होतंय अक्षरा-अधिपतीच्या लग्नाचं शूटिंग, अनुभव सांगत दोघं म्हणाले, “हा सेट…”
madhu chopra
Video: “परिणीतीला काय गिफ्ट दिलं?” खुलासा करत प्रियांका चोप्राची आई म्हणाली, “त्यांच्या लग्नात…”
Dnyanada supriya
‘ठिपक्यांची रांगोळी’तील अप्पूने सांभाळलं सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलचं कॅश काउंटर, जाणून घ्या नेमकं काय घडलं…

आणखी वाचा : ‘असा’ असेल अक्षरा-अधिपतीचा राजेशाही विवाह सोहळा, लग्नात येणारे ट्विस्ट अँड टर्न्स समोर, घ्या जाणून

सध्या छोट्या आणि खड्याच्या मंगळसूत्राची फॅशन आहे. तर काही मालिकेतील अभिनेत्री छोटं पण सोन्याचं आणि त्यात काळे मणी ओवलेलं साधं मंगळसूत्र घालताना दिसत आहेत. पण अक्षरा मात्र पारंपारिक लांब आणि दोन वाट्या असलेलं पारंपरिक मंगळसूत्र घालताना दिसणार आहे. या लग्नाच्या व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये देखील हे तिचं लांब मंगळसूत्र दिसत आहे.

हेही वाचा : नितीन देसाई यांच्या N.D Studio मध्ये होतंय अक्षरा-अधिपतीच्या लग्नाचं शूटिंग, अनुभव सांगत दोघं म्हणाले, “हा सेट…”

दरम्यान अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नामध्ये बरेच ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना पाहायला मिळतील. अत्यंत राजेशाही थाटामध्ये यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. तर या विवाह सोहळ्याचा शूटिंग कर्जतच्या एन.डी स्टुडिओमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनातील या लग्नाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshara in tula shikavin changlach dhada serial will be wearing traditional long mangalsutra rnv

First published on: 29-09-2023 at 19:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×